Categories: राजकीय

सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी दौंड च्या महिला उतरल्या मैदानात

अब्बास शेख

दौंड : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच बारामती लोकसभा मतदार संघात सर्वात जास्त लक्ष केंद्रित झाले आहे. कारण यावेळी लढाई पवार विरुद्ध पवार अशी असून कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जागा जिंकायचीच असा चंग अजित पवार गटाने बांधला आहे तर काहीही झाले तरी आपला गड राखायचाच असा विडा शरद पवार गटाने उचलला आहे.

या सर्व प्रक्रियेत आता महिलाही मागे राहिलेल्या नाहीत. विविध तालुक्यातील महिलांनी आता प्रचाराची धुरा सांभाळत सुप्रिया सुळे यांचा जोरदार प्रचार सुरु केला आहे. याचा प्रत्यय काल सुनंदा पवार यांच्या दौऱ्यावेळी पहायला मिळाला असून विविध गावांतील अनेक महिलांनी सुप्रिया सुळे यांना जाहीर पाठिंबा दर्शवीला आहे.
काल मळद, नंदादेवी, रावणगाव, खडकी, लोणारवाडी, खानोटा, राजेगाव, नायगाव, वाटलूज, मलठण या ठिकाणी सुनंदा पवार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी सुप्रिया सुळे यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले.

सुनंदा पवार यांच्यासोबत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला पदाधिकारी योगिनी दिवेकर ह्या आवर्जून उपस्थित होत्या. योगिनी दिवेकर यांनी आपल्या माध्यमातून अनेक महिला ह्या सुप्रिया सुळे गटाला जोडून दिल्याचे पहायला मिळाले. एकंदरीतच सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आता महिलांनीही कंबर कसल्याचे पहायला मिळत असून महिलांचा वाढता सहभाग हा सुप्रिया सुळे यांच्यासाठी पोषक असल्याचे मानले जात आहे. कालच्या दौऱ्यामध्ये शरदचंद्र पवार गटाचे दौंड तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार, रामभाऊ टुले, अजित शितोळे यांसह पवार गटाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पवार साहेबांचे विचार सर्वसामान्य नागरिकांना पटवून देण्यात ते यशस्वी होताना दिसत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

14 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago