Women Murder in Pune – ‛त्या’ महिलेच्या खूनाचा अखेर उलगडा, एकाच दिवशी ‛पोलीस हवालदार’ आणि ‛त्या’ महिलेचा बुधवार पेठ परिसरात झाला होता ‛खून’



| सहकारनामा |

पुणे : दि. 5 मे रोजी 

बुधवार पेठ परिसरात दोघांचे खून (murder in pune) झाले होते. यामध्ये एक पोलीस हवालदाराचा खून झाला होता तर दुसरा खून देहविक्री करणाऱ्या एका महिलेचा करण्यात आला होता. बुधवार पेठ परिसरात एकाच दिवशी दोन खून झाल्याने पोलीस खात्यासह नागरिकांमध्येही मोठी खळबळ माजली होती.

पोलिस हवालदाराच्या खून (police murder in pune) प्रकरणी एका तडीपार गुंडास जेरबंद करण्यात आले होते मात्र दुसरा खून कोणी केला याबाबत पोलीस तपास करीत होते.पोलिसांनी महिलेच्या खूनाचा संपूर्ण तपास करून अखेर खुन्याचा शोध लावण्यात यश आले  असून फरासखाना पोलिसांनी महिलेच्या खून प्रकरणी आरोपी मोहम्मद बहरूल हक (रा.काळेवाडी, मुळ आसाम) याला अटक केली आहे.

आरोपी हा महिलेचा  खून केल्यानंतर फरार होण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला जेरबंद केले आहे. आरोपीने पोलिसांना माहिती देताना दि. 5 मे रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास त्यानेच ‛त्या’ महिलेचा खून केल्याचे कबुल केले आहे. हि महिला त्याच्या ओळखीची असल्याचेही त्याने कबुली देताना म्हटले आहे.

वरील कामगिरी हि अप्पर  पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, राजेश तटकरे, पोलीस निरीक्षक, अभिजीत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, अजितकुमार पाटील, पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार रिजवान जिनेदि, वैभव स्वामी, मेहबुब मोकाशी, सयाजी चव्हाण, मोहन दळवी, सचिन सरपाले, राकेश क्षीरसागर, मयुर भोकरे, अभिनय चौधरी, महंमद हनीफ शौकत शेख, अमोल सरडे, पंकज देशमुख, अजित शिंदे, तुषार खडके, गौतम किरतकुडवे, शरद वाकसे यांनी केली आहे.