बारामती तालुक्यात पुन्हा एक खून | महावितरण महिला कर्मचाऱ्याचा कोयत्याने सपासप ‘वार’ करून खून

Crime News

बारामती : बारामती तालुक्यामध्ये सध्या खून सत्राने कमाल पातळी ओलांडली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विविध ठिकाणी खुनाच्या घटना घडल्या आहेत. आज मोरगाव येथे सकाळी 11 वाजता एका महिला कर्मचाऱ्याची कोयत्याने सापसप वार करून हत्या करण्यात आली आहे.

पहा व्हिडीओ – भाजप आणि राष्ट्रवादी हे एकाच माळेचे मनी

रिंकू थिटे (वय 33) असे हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव असून सुपे पोलिसांनी आरोपी अभिजित दत्तात्रय पोटे (वय 26) याला अटक केली आहे. आरोपी पोटे याने वीजबिलाच्या वादातून महावितरण कर्मचारी रिंकू थिटे यांच्यावर महावितरण कार्यालयातच कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात रिंकू थिटे ह्या गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांना प्राथमिक उपचार करून पुण्यातील रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र दुपारी साधारण तीन वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

महावितरण महिला कर्मचाऱ्याची किरकोळ कारणासाठी निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण बारामती तालुक्यात खळबळ माजली आहे तर महावितरण कर्मचाऱ्यांकडून या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला आहे.