सातारा : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार या महिलेने प्रकरण मिटविण्यासाठी 3 तीन कोटींची खंडणी मागितली होती असा आरोप करून तिला 1 कोटीची खंडणी घेताना सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाने तिला अटक केल्याचे समोर येत आहे.
हे प्रकरण 2017 चे असून सदर महिलेने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणातून जयकुमार गोरे यांची 2019 साली निर्दोष मुक्तता करण्यात आली होती मात्र त्यानंतर पुन्हा या महिलेने जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करत राज्यपालांना पत्र लिहून उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले होते.
मात्र त्या आधीच या महिलेला 1 कोटी रुपयांची खंडणी घेताना सातारा पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. सदर प्रकरण मिटविण्यासाठी या महिलेने 3 कोटींची खंडणी मागितली होती त्यापैकी तिने 1 कोटीची रक्कम स्वीकारताना तिला सातारा सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याबाबत मंत्री जयकुमार गोरे यांनी बोलताना आपण यावर लगेच कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, पोलिसांना त्यांचा तपास करू द्या, यातून अजूनही अनेक बाबी समोर येतील असे सांगितले आहे.