दौंड : श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आज रोटी घाटातील अवघड वळण सर करत अखेर अवघड असा टप्पा पार केला. रोटी घाट सर करताना पालखीला नऊ बैल जोडी लावून पालखी ओढण्यात आली. यावेळी उपस्थित भक्तगण मोठ्या हर्षोल्लाहसात पालखी सोबत चालत होते.
वरवंड येथील मुक्काम आटोपून शनिवारी सकाळी सहा वाजता आरती करून पालखी सोहळा पाटस च्या दिशेने मार्गस्थ झाला. अतिशय भक्तिमय वातावरणात श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा दौंड तालुक्यातून बारामती तालुक्याच्या उंडवडी च्या दिशेने पुढील मुक्कामाच्या दिशेने निघाला. पाटस पार केल्यानंतर दुपारच्या सुमारास पालखी सोहळा रोटी घाटात पोहचला त्यावेळी पालखीला सुमारे नऊ बैल जोड्या जुंपण्यात आल्या. सोहळ्यातील कठीण समजला जाणारा रोटी घाट श्री. संत तुकाराम महाराजांच्या पालखीने हरी नामाच्या जय घोषासह टाळ-मृदंगाच्या गगनभेदी निनादात सहज सर केला.
रोटी घाट हा नागमोडी वळणामुळे प्रसिद्ध आहे. या घाटामध्ये श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीने नागमोडी वळण सहज पार करत मुख्य टप्पा घाटला. पालखीला यावेळी ९ बैल जोड्या जुंपल्या होत्या. रोटी घाट पार केल्यानंतर रोटी च्या ग्रामस्थांकडून पालखी सोहळ्यास भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून आरती करत पालखीचे स्वागत करण्यात आले.
संत तुकाराम महाराजांचा हा पालखी सोहळा हिंगणी गाडा येथील नागेश्वर महाराज मंदिरातील विसाव्यानंतर बारामती तालुक्यातील उंडवडी मुक्कामी रवाना झाल