Categories: सांगली

आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रयत्नाने 41 कोटी 43 लाख 13 हजार रुपयांचा निधी मंजूर, नागपूर हिवाळी अधिवेशनात विविध कामांना मंजुरी

सुधीर गोखले

सांगली : आमदार सुधीर गाडगीळ यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे सांगली विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी ४१ कोटी ४३ लाख १३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मतदारसंघातील रस्ते डांबरीकरण, रुंदीकरण, रेल्वे अंडरपास कामांसाठी हा निधी मंजूर झाला आहे. अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

या विकासकामांचा गेल्या अनेक दिवसांपासून आमदार सुधीर गाडगीळ यांनी मंत्री, संबंधित खात्याचे सचिव, वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून पाठपुरावा केला होता. कुपवाड लक्ष्मी मंदिर ते वसंतदादा कुस्ती केंद्रापर्यंतचा रस्ता रुंदीकरण व सुधारणा कामासाठी ९ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. काकानगर ते शिवशंभो चौक या रस्त्याच्या रुंदीकरणासह सुधारणा कामासाठी ४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तसेच नांद्रे-नावरसवाडी रस्त्याच्या रुंदीकरणासह सुधारणा कामासाठी ७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. माधवनगर-नांद्रे (जुना रेल्वे ट्रॅक) रस्त्याझच्या दुरवस्थेमुळे परिसरातील ग्रामस्थांची गैरसोय होत होती. या प्रश्नावर शेतकरी, ग्रामस्थांची आंदोलनेही झाली होती.

आमदार सुधीर गाडगीळ यांनी या कामासाठी वरिष्ठ पातळीवरुन पाठपुरावा केला. आता कर्नाळ रेल्वे अंडरपास ते नांद्रे असा मार्ग निश्चित झाला आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात भूसंपादनासाठी २० कोटींचा निधी मंजूर झाला. भूसंपादनाच्या कामास लवकरच प्रारंभ होऊन प्रत्यक्ष अंडरपास रस्त्याच्या कामास सुरुवात होणार आहे कर्नाळ ते रेल्वे ट्रॅक रस्ता कामासाठी १ कोटी ४३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या पाच कामांसाठी ४१ कोटी ४३ लाखांचा निधी उपलब्ध झाल्याने मतदारसंघातील महत्वाची कामे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची भावना आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केली.

हिवाळी अधिवेशनात निधीला मंजुरी मिळाल्यामुळे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह महायुती सरकारचे आभार मानले.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

9 मि. ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

20 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago