Categories: क्राईम

तिच्याशी ‘अनैतिक सबंध’ का ठेवता असे विचारल्याने पत्नीचा ‘दात’ पाडला… सुपे येथील मुस्लिम महिलेची पोलिसांत धाव, गुन्हा दाखल

सुपे / बारामती : स्वतःला स्वयंघोषित ‘भाई’ समजून ‘ती’ भाईगिरी आपल्या घरात दाखवून महिलांवर अत्याचार करण्याची सवय अजूनही पुरुषी अहंकारातून गेलेली दिसत नाही आणि त्यामुळे पिढ्यानपिढ्या महिलांना अजूनही अत्याचाराचा सामना करावाच लागत असल्याचे दिसत आहे.
असेच घरगुती हिंसाचाराचे प्रकार सध्या बारामती तालुक्यातील सुपे येथे विवाहित मुस्लिम महिलांसोबत घडत असताना दिसत असून त्यांच्यावर होणारे अन्याय कधी थांबणार असा सवाल मुस्लिम महिला वर्गातून केला जात आहे.

काल, परवा एका महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी जबर मारहाण केल्याची घटना समोर आल्यानंतर त्याहूनही अधिक भयानक घटना घडल्याचे आता समोर आले आहे.
केवळ पत्नीने आपल्या पतीला तुम्ही घरी उशीरा का आले, तुम्ही तिच्याशी अनैतिक संबंध का ठेवता, तिच्यासोबत फिरायला का जाता असा प्रश्न विचारल्याने बिथरलेल्या पतीने स्वतःच्या पत्नीला जबर मारहाण करत थेट तीचा दातच पाडल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याबाबत वडगाव पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या फिर्यादीवरून या पती विरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित महिला सौ.जन्नत करीम तांबोळी (वय 29 वर्षे व्यवसाय गृहिणी रा. सुपे ता. बारामती) हिने आपला पती आरोपी करीम उस्मानभाई तांबोळी (रा.सुपे ता.बारामती जि.पुणे) यास रात्री उशीरा घरी आलेने तुम्ही ‘त्या’ स्त्री बरोबर अनैतीक संबंध का ठेवता व तुम्ही नेहमीच तिचेबरोबर फिरायला का जाता असे म्हणालेचे कारणावरून पती करीम तांबोळी याने पत्नीच्या तोंडावर, पोटावर हाताने लाथाबुक्याने मारहाण करून पत्नी जन्नत हिच्या तोंडामधील वरील बाजुचा एक दात पाडुन अपखुशीने मोठी दुखापत केली. या प्रकारानंतर जन्नत ही ओरडली असता पती करीम याने हातात लाकडी दांडके घेवुन तिला जिवे मारण्याची भिती दाखवुन शिवीगाळ व दमदाटी केली. सदर प्रकरणात पत्नी जन्नत तांबोळी हिने पती करीम तांबोळी (रा. सुपे ता. बारामती जि.पुणे) याच्या विरूध्द फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पो.ना. धुमाळ हे करीत आहेत.

सुपे गावात अनेक मुस्लिम महिलांसोबत घरगुती हिंसाचार होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून ‘एक गेली तर दुसरी आणू , त्याने नाही का आणली’… अमुक ने बायकोला इतकी मारली त्याला काही झाले नाही मग आपले तरी कोण काय वाकडे करणार! या अविर्भावातून अनेक मुस्लिम महिलांना त्यांच्या पती आणि सासरच्या मंडळींकडून जाच सहन करावा लागत असल्याची गंभीर बाब समोर येऊ लागली आहे. त्यामुळे सुपे ता.बारामती येथील मुस्लिम महिलांचे अधिकार आणि त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

20 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago