Categories: पुणे

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

दौंड : दौंड तालुक्यात सध्या नेत्यांपेक्षा पोत्यांनी वातावरण जास्त तापवलेलं दिसतंय. कारण कोण, कधी, काय लिहितो आणि मी मध्ये येऊन लगेच तळी कशी उचलतो याची जणू  काही स्पर्धाच काहींनी सुरु केल्याचं दिसत आहे.

बालिश पणाचा कहर म्हणजे जे अधिकृत प्रसार माध्यमे आहेत. ज्यांकडे बातम्या छापण्यासाठी केंद्र सरकारची लागणारी अधिकृत (RNI) ची मान्यता आहे. ज्या अधिकृत माध्यमांची पोर्टल आहेत त्या अधिकृत माध्यमांनाच काही बालिश आणि वृत्तपत्र, माध्यमांचा कच्चा अभ्यास असणारे सोशल मीडिया म्हणून संबोधू लागले आहेत. आणि स्वतःला मात्र लिखाणाचा स्वयंघोषित सम्राट समजून वाट्टेल ते, वाट्टेल तसे एका खाजगी वेबसाईटच्या माध्यमातून आपले ज्ञान पाजळू लागले आहेत. राजकारण, टिका आणि सगळे वेडे मीच फक्त हुशार, मला घाबरायला हवे असा इगो घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून उतरलेले महाभाग आपल्या सोशल मीडियाच्या प्लॅट फॉर्मवर एकही जनताभीमुख माहिती का प्रसिद्ध करत नसावे आणि फक्त दुसऱ्यांवर टिका टिप्पणी करून स्वतःला सुखावत असलेले महाभाग उगच नको तिथे आपले नाक खुपसायचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहेत.

आपले चांगले ज्ञान लोकांच्या भल्यासाठी कामाला आणण्याचा प्रयत्न लिखाणातून करायचा असतो इथे मात्र उलट-सुलट लिहून आपले अगाध ज्ञान पाजळले जात असल्याचे दिसत आहे. उगच नको तिथे अधिकृत प्रसार माध्यमांच्या, वृत्तपत्र व त्याच्या पोर्टलवरील त्या बातम्यांवर आपले नाक खुपसून लोकांमध्ये त्याची वाहवा करण्यासाठी सोशल मिडीयचा आधार घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला  जात आहे.

आजही काहीजण असल्या लिखाण करणाऱ्यांना जेष्ठ समजून इज्जत देत आले आहेत मात्र त्या इज्जतीला आपला धाक समजून स्वतःची टीमकी मिरविणाऱ्यांना आता आपले बिंब आरश्यात पहावे लागणार असे दिसत आहे. दोन हाना पण लिखाण सम्राट म्हणा ही सवय लोकांच्या मनातून उतरण्यास कारणीभूत ठरल्याची चर्चा सोशल मिडियावर सुद्धा होऊ लागली आहे. येऊ नको, तर कुठं बसू अशी अवस्था सध्या काहींची पहायला मिळत आहे.

त्यामुळे नेत्यांपेक्षा यांनीच उमेदवारी अर्ज भरावेत आणि आपल्याला किती मतदान मिळते याची एकदा चाचपणी करावी अशी मागणीही होत आहे. कुणाच्या आडव्यात जाण्याची सवय नसलेल्यांना मात्र हे मुद्दाम आडवी मारू लागल्याचे आता त्यांच्या कृतिवरून दिसत आहे. त्यामुळे अगोदर अधिकृत माध्यम धरा, अण मग लिखाण करा अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

36 मि. ago

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

2 तास ago

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

11 तास ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

1 दिवस ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

4 दिवस ago