कारखान्याच्या निवृत्त कामगारांच्या मृत्युंचे राजकारण नेमके कुणी केले ! खोटी माहिती पसरवून बदनामी करण्याच्या षडयंत्रमागे नेमकं कोण..?

दौंड : गेल्या काही दिवसांपूर्वी भीमा पाटस कारखान्याच्या परिसरात उपोषणस्थळी बसलेल्या पाच निवृत्त कामगारांचे मृत्यू झाले अशी बातमी सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली आणि या बातमीद्वारे विधानसभा निवडणुकीला उभे असलेले उमेदवार राहुल कुल यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ज्यावेळी खुद्द या मृतांचे नातेवाईक मीडिया पुढे आले आणि त्यांनी खरी परिस्थिती सांगितली त्यावेळी या सोशल मिडीया बहाद्दरांची तालुक्यातील जनतेने त्याच सोशल मीडियावर चांगलीच खरडपट्टी काढली.

मात्र हे सर्व होऊन इतक्यावर थांबतील ते अनधिकृत सोशल मीडिया बहाद्दर कसले. या बहाद्दरांनी पुन्हा काही व्हिडिओ क्लिप्स बनवून व्हायरल करण्यास सुरुवात केली आणि कुणी कामगारांच्या मृत्युंचे राजकारण करू नये असे म्हणू लागले. मात्र मृतांच्या मृत्युंचे राजकारण खरं केलं कुणी आणि पुन्हा कांगावा करतंय कोण असा प्रश्न आता दौंड तालुक्यातील जनता या सोशल मीडिया बहाद्दरांना विचारू लागली आहे.

ज्या व्यक्ती तीन वर्षांपूर्वी मृत झाल्या किंवा ज्या व्यक्ती कधी उपोषणस्थळी गेल्याच नाहित त्या व्यक्तींचा मृत्यू कारखान्यावर सुरु करण्यात आलेल्या निवृत्त कामगारांच्या उपोषणावेळी झाला असे धादांत खोटे लिखाण करून ते पसरविण्यात आले. हे सर्व होत असताना काही मृतांच्या  नातेवाईकांनी मीडिया समोर येऊन सत्य हकीकत कथन केली आणि यावेळी त्यांनी केलेल्या खुलाश्याने तालुक्यात खळबळ माजली. या प्रकारे खोटे नाटे लिहून कुणी खालच्या थराचे राजकारण करू नये अशी विनंतीही यावेळी त्यांनी केली होती.

यातीलच दुसरा प्रकार घडला तो नुकतेच निधन झालेल्या निवृत्त कर्मचारी भामाबाई मोरे यांच्या बाबतचा. भामाबाई मोरे ह्या सुमारे दहा ते बारा वर्षांपूर्वी कारखान्यातून निवृत्त झाल्या होत्या. त्यांचे सर्व पैसे त्यांना कारखान्याने त्यावेळीच दिले होते असे त्यांच्या मुलाने सांगितले. तसेच त्यांना दीड वर्षांपूर्वी ब्रेन स्ट्रोक झाला होता आणि काही दिवसांपूर्वी पुन्हा त्यांना त्याचा त्रास होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र त्या कधी उपोषणस्थळी गेल्या नाही किंवा त्यांचा तेथे जाण्याचा काही संबंधही नव्हता असेही त्यांच्या मुलाने सांगितले आणि सर्वांनी त्यांची ती मुलाखतही पाहिली.

मात्र केवळ आकसा पोटी म्हणा किंवा उमेदवाराला बदनाम करून निवडणुकीत त्रास देण्यासाठी म्हणा भामाबाई मोरे यांचे निधन उपोषण स्थळी झाले आणि त्यांना कारखाना देणे बाकी होता असा खोटा प्रचार कारण्यात आला. त्यामुळे मृत कारखाना कामगारांच्या मृत्युंचे राजकारण नेमके कोण करीत आहे आणि का करत आहे. त्यातून त्यांना काय साध्य करायचे आहे हेही आता जनतेच्या लक्षात पूर्णपणे आले आहे. त्यामुळे खोटं नाटं लिखाण करून ते सोशल मीडियावर फिरवले म्हणजे आपलं साध्य होईल हा अफवा पसरविणाऱ्यांचा निव्वळ गैरसमजच म्हणावा लागेल.