Categories: Previos News

आमच्याबद्दल अश्लील वक्तव्य करणारे तुम्ही कोण! रामदेव बाबावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा – जिजाऊ ब्रिगेडची मागणी

दौंड

योग गुरु रामदेव बाबा यांनी ठाणे येथील कार्यक्रमात महिलांचा पेहराव, कपडे, सुंदरता या विषयी भाष्य केल्यानंतर त्यांच्यावर चोहोबाजूने टिका होत आहे. यात आता जिजाऊ ब्रिगेडचीही इंट्री झाली असून अत्यंत अश्लील व अपमान करणारे आणि लज्जा उत्पन्न करणारे वक्तव्य केले आहे असा आरोप दौंड तालुका जिजाऊ ब्रिगेड ने करत रामदेव बाबा यांचा निषेध केला आहे आणि यवत पोलीस स्टेशन येथे रामदेव बाबा यांच्यावर कलम 354 अन्वये गुन्हा दाखल करावा आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा संविधानिक मार्गाने जिजाऊ ब्रिगेड तीव्र आंदोलन करेल असे निवेदन त्यांच्यावतीने यवत पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे.

निवेदन देतेवेळी सारिका भुजबळ (तालुका अध्यक्ष) सपना गांधी (तालुका उपाध्यक्ष) सारिका देशमुख (तालुका कार्याध्यक्ष) तृप्ती पांढरे (तालुका सचिव) या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने यावेळी दौंड तालुका जिजाऊ ब्रिगेड च्या रणरागिणी उपस्थित होत्या

निवेदन दिल्यानंतर जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्ष सारिका भुजबळ यांनी बोलताना, भारतीय संविधानाने आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे त्यामुळे हीजाब, टिकली, साडी, सलवार, पॅन्ट, शर्ट, काय नेसायचं हे आम्ही आमचं बघू, काय घालायचं आणि काय नाही ते आम्ही आमचं ठरवू त्यात इतरांनी नाक खुपसू नये आणि यापुढे तोंड सांभाळून बोलायचं अन्यथा या जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिणी तुमचं थोबाड काळ केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा दिला.

पुढे बोलताना त्यांनी, आम्हाला चपाती करताना लाटणं व्यवस्थित हाताळता येत,
त्यामुळे जाहीर रित्या बोलताना महिलांचा उल्लेख आदराने करण्यात यावा अन्यथा आम्ही आई जिजाऊ, आई अहिल्या, आई सावित्री, आई रमाई, आई मुक्ताई, आई फातिमा यांचे रूप धारण करून तुम्हाला जशास तसे उत्तर देऊ असेही सांगितले.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

5 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

7 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

9 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago