‘त्या’ सात जणांना मारताना रक्ताच्या नात्याची सुद्धा जाण राहिली नाही ! सख्ख्या ‘पाच’ भाऊ बहिणीने ‘तीन’ चिमुरड्यांसह ‘सात’ जणांना कसे मारले.. वाचा घटनाक्रम

अब्बास शेख

पुणे / दौंड : म्हणतात ना माणसाचा सर्वात मोठा शत्रू त्याचा संशय, राग आणि अहंकार असतो आणि तो माणसाला जीवनातून कायमचा उठवतो. अशीच काहीशी घटना आज दौंड तालुक्यातील नागरिकांना पहायला मिळत आहे. केवळ संशय आणि रागातून स्वतःचा चुलत भाऊ त्याची पत्नी, भावाचा जावई, भावाची मुलगी (पुतणी) आणि तिची लहान लेकरे यांची हत्या करून त्यांचे मृतदेह पारगाव (ता.दौंड) येथील भीमा नदी पात्रात आणून टाकल्याची अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या वाटणाऱ्या घटनेचे थेट हत्येत रूपांतर झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.

भीमा नदी पात्रात मृतावस्थेत आढळलेल्या मोहन उत्तम पवार (वय ४५) त्यांची पत्नी संगीता उर्फ शहाबाई मोहन पवार (वय ४० दोघे मूळ रा.खामगांव गेवराई जि.बीड ) त्यांची मुलगी राणी शाम फुलवरे (वय २४ वर्षे) जावई शाम पंडित फुलवरे (वय २८ वर्षे ) आणि त्यांची तीन मुले रितेश शाम फुलवरे (वय ७ वर्षे), छोटू शाम फुलवरे (वय ५ वर्षे) आणि कृष्णा शाम फुलवरे (वय ३ वर्षे सर्व मूळ रा.हातोला, ता.वाशी जि.उस्मानाबाद) या सर्वांची हत्या मृत मोहन पवार यांचेच चुलत भाऊ १) अशोक कल्याण पवार (वय ३९ वर्षे) २) शाम कल्याण पवार (वय ३५ वर्षे) ३) शंकर कल्याण पवार (वय ३७ वर्षे) ४) प्रकाश कल्याण पवार (वय २४ वर्षे) आणि त्यांची बहीण ५) कांताबाई सर्जेराव जाधव (वय ४५ वर्षे, सर्व रा. ढवळेमळा, निघोज ता. पारनेर जि.अहमदनगर) यांनी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

आरोपी अशोक पवार याच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता आणि आपल्या मुलाचा मृत्यू हा मोहन पवार याच्यामुळेच झाला असावा हि शंका आणि रागातून वरील सख्ख्या पाच भाऊ, बहिणीने या सात जणांची हत्या केली. मात्र हे हत्याकांड करताना त्या लहान  तीन चिमरूड्यांचा विचार सुद्धा या निर्दयी लोकांनी का केला नसावा या विचारानेच अनेकांचे डोळे पाणवत आहेत.

गेल्या तीन दिवसांपूर्वी पारगाव (ता.दौंड) येथील भीमानदीच्या पात्रामधून हे मृतदेह एक-एक करून वर येऊ लागले होते. मृतांची संख्या चारवर पोहोचल्यानंतर मात्र हा काहीतरी भयानक प्रकार असल्याची जाणीव सर्वांना झाली. यातील मृत महिलेजवळ सापडलेल्या मोबाईलवरून हे लोक निघोज येथील असल्याची माहिती मिळाली तसेच यांच्यासोबत तीन लहान मुलेहि असल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांसह सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली.

काल दि.२४ जानेवारी रोजी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण च्या अग्निशमन सेवा पथक तसेच यवत पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी अथक परिश्रम घेत तीन लहान मुलांचे मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढले. यावेळी हि सामूहिक आत्महत्या असल्याचा कयास लावला गेला मात्र मृत्यांच्या नातेवाईकांनी हे लोक आत्महत्या करूच शकत नाहीत हि हत्याच असल्याचा संशय व्यक्त केला आणि पोलिसांची चक्रे पुन्हा वेगाने फिरू लागली. पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी विविध पोलीस पथके तयार करून ती वेगवेगळ्या ठिकाणी पाठवत माहिती घेण्यास सुरुवात केली आणि यात मोठी माहिती हाती लागली. या सात लोकांच्या आत्महत्या नसून ती हत्याच आहे आणि तीही त्यांच्या नातेवाईकांनी केली असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले. पुणे ग्रामीण पोलीस तसेच यवत पोलिसांनी लागलीच पाच आरोपिंना अटक केली आणि या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

17 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago