काय सांगता ! 5 लाखाची कार अवघ्या 2 लाख मध्ये, पहा ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते

अब्बास शेख

पुणे : Olx ,फेसबुक वर 5 लाख रुपयांची कार अवघ्या 2 लाख रूपायांना मिळत आहे. ही आपल्यासाठी सुवर्णसंधी आहे, तिचे 5 ते 6 फोटो ही पाहण्यासाठी उपलब्द असून ही गाडी सिंगल ओनर आणि MH 12 मध्ये आहे. विकणाऱ्या व्यक्तीचा नंबरही उपलब्ध आहे मग वाट कसली पाहताय फिरवा नंबर घेऊन टाका गाडी… हाच विचार मनात आला आहे ना..! (Sahkarnama-सहकारनामा) पण थोडं थांबा कारण ही पोस्ट फेक आहे, 5 लाखाची गाडी कोणीही 2 लाख रुपयांना देणार नाही, उलट तुमचे टोकण, इसार म्हणून दिलेले लाखो रुपये बुडणार आहेत. आणि फसवणुकीचा हा प्रकार अनेकांसोबत घडत असूनही अधिक लोक अश्या फसव्या पोस्ट, जाहिरातींना बळी पडत आहेत.

काय काळजी घ्याल..

अश्या प्रकारच्या जाहिराती समोर आल्यानंतर सर्वात अगोदर त्या गाडीचा डीलर रेट माहिती करून घ्या, 5 लाखाच्या गाडीचा डीलर रेट साधारण 4 ते 4.25 च्या आसपास असू शकतो. डीलर अशी गाडी घेऊन किमान 25-30 हजार रुपये गाडीला खर्च करतो. त्यानंतर ती गाडी कुठेतरी 5 लाखाच्या आत बाहेर विक्रीला ठेवली जाते. विचार करा ज्या गाडीचा डीलर रेट 4 लाख आहे ती गाडी ती व्यक्ती तुम्हाला 2 लाख रुपयांमध्ये का देत असेल..? याचे उत्तर बहुतेक तुमच्या लक्षात आले असेल (Sahkarnama-सहकारनामा)

तुम्हाला त्या व्यक्तीची सत्यता जाणून घ्यायची असेल तर हे करा आणि चोर पकडला जाईल..

तुम्ही अशी कार घेण्याचा विचार करत असताना ज्यावेळी त्या व्यक्तीला फोन लावाल त्यावेळी त्याच्याही शुद्ध मराठीमध्ये बोला, एक लक्षात घ्या हे फसवणूक करणारे लोक बाहेरील राज्यातून आपल्या जिल्ह्यातील ग्रुप आणि लोकेशनवर या फसव्या पोस्ट करत असतात. ज्यावेळी अश्या व्यक्तीशी तुम्ही शुद्ध मराठी गाडीची माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न कराल त्यावेळी तो समोरील व्यक्ती नक्कीच थोडा गडबडला जाईल, तो शक्यतो हिंदी मध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करेल पण तुम्ही त्याला शुद्ध मराठी मध्ये माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा. यावेळी तुम्हाला तुमचे प्रश्न वेगळे आणि त्याचे उत्तर वेगळे येत असल्याचे जाणवेल (सहकारनामा-Sahkarnama)

यावेळी तो तुम्हाला गाडी माझ्या घरी म्हणजे राज्यातून बाहेर किंवा जवळच आहे पण अनेक लोक ही गाडी घेण्यासाठी इच्छूक आहेत त्यामुळे तुम्हाला ती घ्यायची असेल तर अगोदर काही इसार पाठवा मी ती गाडी तुमच्या पत्त्यावर पाठवून देईल किंवा गाडी तुम्हाला घ्यायची आहे असे समजून तीची जाहिरात थांबवतो असे म्हणेल. यावेळी मात्र तुम्ही त्याला शेवटचा एकच प्रश्न करा… मला पत्ता पाठवा, मी स्वतः गाडी पहायला येतो आणि तिथेच संपूर्ण कॅश किंवा ऑनलाईन पेमेंट करून गाडी विकत घेतो.. तुमच्या या प्रश्नानंतर पुढील व्यक्तीने तुमचा फोन नक्कीच कट केलेला तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हीही अश्या फ्रॉड व्यक्तीपासून वाचलात याचे समाधान तुमच्या चेहऱ्यावर असेल (सहकारनामा-sahkarnama)

लक्षात ठेवा फक्त फेसबुक, Olx किंवा सोशल मिडियावर गाडीचे फोटो पाहून कधीच ती खरेदी करू नका तर अगोदर स्वतः ती गाडी पहा, तिचे इंजिन आणि बॉडीलाईन मेकॅनिक कडून तपासून घ्या. त्या गाडीचे आर सी (RC) आर टी ओ एजंटकडून तपासून घ्या आणि सर्व व्यवस्थित असेल तरच ती गाडी घ्या.. अश्याच नवनवीन माहितीसाठी आमचे सहकारनामा फेसबुक पेज, युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा तसेच आमच्या sahkarnama.in या वेबसाईटला भेट देत चला (सहकारनामा-Sahkarnama)