केडगावच्या जवाहरलाल विद्यालयात 10 वी च्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

केडगाव (दौंड) : आज पासून सुरु झालेल्या 10वी च्या माध्यमिक शालांत परीक्षेनिमित्त केडगाव ता. दौंड येथील जवाहरलाल विद्यालयात परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शिक्षक आणि संस्थाचालकांकडून गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शाळेचे प्राचार्य मुकुंद भिसे, केंद्र संचालक एन डी टुले, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेळके पाटील, कार्याध्यक्ष सुनिल निंबाळकर, सचिव धनाजी शेळके, पोलीस पाटील हनुमंत हंडाळ यांसह विद्यार्थी पालकवर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

आज 10 वी च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा पहिला पेपर होता. केंद्र क्र.1404 जवाहरलाल विद्यालयात एकूण 6 शाळेतील 392 परीक्षार्थी विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत. यासाठी 17 वर्गखोल्या असून जवाहरलाल विद्यालय केडगाव, स्वामी विवकानंद विद्यालय (आंबेगाव) श्रीनाथनगर विद्यालय (बोरिपार्धी) मनोरमा मेमोरियल गर्ल्स हायस्कुल केडगाव, मनोरमा इंग्लिश मेडीअयम स्कुल केडगाव, जेधे इंग्लिश मेडीयम स्कुल बोरिपार्धी अश्या सहा शाळांमधील विद्यार्थी येथे परीक्षा देण्यास आले आहेत अशी माहिती केंद्र संचालक एन.डी. टुले आणि प्राचार्य मुकुंद भिसे यांनी दिली.

यावेळी संस्थेचे सचिव धनाजी शेळके यांनी विद्यार्थ्यांना बोर्डाचे नियम पाळण्याचे व कॉपी न करण्याचे आवाहन केले तर प्राचार्य मुकुंद भिसे यांनी परीक्षा निर्भय व आनंदी वातावरणात पार पाडण्यासाठी संस्थेने व विद्यालयाने सोर्वोतोपरी प्रयत्न केले असल्याचे आवर्जून नमूद केले.