Categories: Previos News

दौंड’च्या कटारिया महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे वही,पेन, गुलाब पुष्प देऊन स्वागत, लॉकडाउन नंतर शहरातील शाळा, महाविद्यालय सुरू

दौंड : कोरोना मधील मोठ्या ब्रेक नंतर सर्वत्र शाळा, महाविद्यालय सुरू झाले आहेत. राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने कॉलेज सुरू करण्यासाठीची जी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत त्याची अंमलबजावणी करीत दौंड मधील महाविद्यालये ही सुरू करण्यात आली आहेत. शहरातील स्व. किसनदास गुलाबचंद कटारिया महाविद्यालयात पहिल्या दिवशी विद्यार्थी, विद्यार्थिनींचे मान्यवरांच्या हस्ते वही, पेन व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या स्वागता मुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ही आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी भिमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया, चेअरमन विक्रम कटारिया, उपाध्यक्ष गोविंद बाबू अग्रवाल, नगरसेवक बबलू कांबळे, नरेश डाळिंबे, विनायक माने, हबीब शेख तसेच महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कोरोना संसर्गाची तीव्रता कमी झाल्यामुळे दि.20 ऑक्टोबर पासून महाविद्यालयाचे वर्ग ऑफलाइन सुरू झाले आहेत. महाविद्यालयाचा पहिला दिवस असूनही विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. कोरोना प्रतिबंधक लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयातच लसीकरण मोहीम राबविणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. सुभाष समुद्र यांनी दिली.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

55 मि. ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

5 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago