पुणे : दौंड तालुक्यातील १४ गावांच्या पाणीपुरवठा योजनांना मान्यता मिळण्यासाठी आमदार कुल यांनी वेळोवेळी विधानसभेत तसेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचेकडे निवेदनाद्वारे केली होती. यासंदर्भात १३ नोव्हेंबर २०१७ रोजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती व दि. १४ डिसेंबर २०१७ च्या हिवाळी अधिवेशनात आमदार अॅड. कुल यांनी या संदर्भात महाराष्ट्र विधानसभेत अर्धातास चर्चा देखील उपस्थित केली होती. त्यानुसार दौंड तालुक्यातील १४ गावांच्या पाणीपुरवठा योजनांना मान्यता मिळाली होती. त्यातील काही गावातील कामांना सुरुवात झाली असून, वाढती लोकसंख्या विचारात घेता काही योजनांचा दुसऱ्या टप्प्यातील वरवंड, बोरीपार्धी, केडगाव येथील पाणी पुरवठा योजनांची सुमारे ३३ कोटी ८ लक्ष रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली असून यामुळे या गावांतील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
दौंड तालुक्यातील ९ गावांचा समावेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत झाला असून, उर्वरित ८१ गावांचा समवेश जलजीवन मिशन मध्ये झाला आहे. यापूर्वी गार – सोनवडी – नानविज या तीन गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व भांडगाव, पाटेठाण व लिंगाळी येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा मंजूर करण्यात आली असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे तर वरवंड व बोरीपार्धी येथील पाणी पुरवठा योजनांसाठी वरवंड तलावातून पाणी उचलले जाणार असून, केडगाव येथील योजनेसाठी माटोबा तलावातून पाणी उचलले जाणार आहे. यामध्ये जलशुद्धीकरण केंद्र, जॅकवेल, आवश्यक ठिकाणी पाणी साठवण टाक्या व वितरण व्यवस्था केली जाणार असून, पुढील दोन वर्षांमध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे देखील आमदार कुल यांनी यावेळी सांगितले
Home Previos News पाणीपुरवठा टेंडर : दौंड तालुक्यातील वरवंड, बोरीपार्धी, केडगाव येथील पाणी पुरवठा योजनांसाठी...