सुधीर गोखले
सांगली : गेल्या काही वर्षांपासून सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील हवेच्या प्रदूषणामध्ये कमालीची वाढ झाल्याचे प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या एका अहवालात नमूद केले होते. दिवाळी दरम्यान तर फटाक्यांमुळे हवेतील प्रदूषणामध्ये आणखीनच भर पडली यावर इलाज म्हणून राजधानी दिल्ली च्या धर्तीवर ‘वॉटर कॅनॉन मशीन सांगलीमध्ये दाखल झाले.
सांगलीतील रस्त्यावर महापालिकेने हे मशीन उतरवले आहे. काल सायंकाळी सांगलीच्या काही प्रमुख रस्त्यांवर या मशीन द्वारे हवेमध्ये पाण्याची फवारणी झाली. हवेतील वाढलेल्या धुलीकरणावर या मशीन द्वारे पाणी फवारले जाते त्यामुळे काही अंशी हे धूलिकण जमिनीवर स्थिरावतात अशी या मशीन ची थोडक्यात संकल्पना आहे.
आयुक्त सुनील पवार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये या मशीन ची चाचणी झाली यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, मुख्य लेखाधिकारी केबळे, सुनील पाटील, पाणी पुरवठा अभियंता कुरणे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. महापालिका क्षेत्रासाठी महापालिकेने अशी एकूण दोन मशीन खरेदी केली आहेत.