Categories: Previos News

Wanted sandalwood smuggler arrested : 16 गुन्हे दाखल होऊन वॉन्टेड असलेला चंदन तस्कर LCB टीम कडून जेरबंद



| सहकारनामा |

पुणे : तब्बल 16 गुन्हे दाखल असलेला आणि सहा महिन्यांपासून वॉन्टेड असलेला चंदन तस्कर आरोपी जेरबंद करण्यात पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखा LCB ला यश आले आहे.

हि कारवाई दिनांक १७/०५/२०२१ रोजी मा.पोलीस अधीक्षक सो मा.डॉ. अभिनव देशमुख यांचे सूचनेप्रमाणे करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक covid -19 चे अनुषंगाने पुणे-नगर रोडवर पेट्रोलिंग करीत होते त्यावेळी त्यांना गोपनीय खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की शिक्रापूर पोलीस स्टेशन दाखल गुन्ह्यातील वॉन्टेड  असलेला संशयित आरोपी अण्णा लक्ष्मण गायकवाड (वय ३६ रा.घोडेगाव ता.नेवासा जि. अहमदनगर)

हा सतरा कमान चौक येथे आलेला आहे. हि माहिती मिळताच सदर पथकाने त्वरित त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता घोडनदी पुलाजवळ त्यांना एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसला.  त्याठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेवून  त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे अण्णा लक्ष्मण गायकवाड व वरील प्रमाणे पत्ता सांगितला. तसेच तू इथे का थांबला आहेस असे पथकाने विचारले असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यावेळी   त्याचे पूर्व रेकॉर्ड पोलिसांनी पाहिले असता त्याच्यावर या पूर्वीचे एकूण १६ गुन्हे दाखल असून  तो शिक्रापूर पो स्टे गु र नं.६६५/२०२०  भा द वि कलम ३७९ वन अधिनियम १९२७ चे कलम ४१,४२(ब) या गुन्ह्या मध्ये वॉन्टेड असल्याची पोलिसांना खात्री झाली. त्यामुळे पोलिसांनी आरोपी अण्णा लक्ष्मण गायकवाड यास ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास शिक्रापूर पोलिसांच्या हवाली केले.

सदरची कामगिरी ही स्थानिक गुन्हे शाखेचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई अमोल गोरे,सहायक फोजदार दत्ता जगताप, पो कॉ बाळासाहेब खडके,अक्षय नवले,प्रसन्न घाडगे,अक्षय जावळे यांच्या पथकाने केली आहे.

Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

4 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

6 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

8 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago