पुणे : सहकारनामा
दि.10/02/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखा (LCB) पुणे ग्रामीण पथक हे जिल्हातील रेकॉर्डवरील (Wanted) वॉन्टेड असलेल्या फरारी आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे मुंबई रोडवर कामशेत हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना वडगाव मावळ येथे दरोडा टाकलेले व वॉन्टेड असलेलेआरोपी विकास तुकाराम जाधव (वय 25 रा कामशेत ता मावळ जिल्हा पुणे) व संतोष उर्फ भावड्या अंकुश वडेकर (वय 22 रा कामशेत) हे कामशेत येथे पवनानगर फाट्यावर येणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्यामुळे या पथकाने पवनानगर कामशेत फाटा येथे सापळा लावून सदर आरोपी याना पकडून नाव पत्ता विचारला असता त्यानी आपली नावे विकास तुकाराम जाधव व संतोष उर्फ भावड्या अंकुश वडेकर अशी असल्याची सांगितले.
त्यांच्याबाबत वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे अभिलेख तपासले असता वरील आरोपी गुरनं 178/2019 भा दं वि कलम 395 मध्ये Wanted असल्याने त्याना वडगाव मावळ पो स्टे येथे पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात देण्यात आले.
या आरोपींवर यापूर्वी
1) वडगाव मावळ पो.स्टे.गु.र.न. 418/19भा.द.वि.क.394 34
2) वडगाव मावळ पो स्टे गु.र.न
443/19भा.द.वि.क.392,34
3) लोणावळा ग्रामीण पोस्टे गु.र.
286/19भा.द.वि.क.394,34
4) कामशेत पोलीस स्टेशन गु.र.न
344/19भा.द.वि.क 394,34 असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट (स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली 1) सपोनि सचिन काळे, 2) सहा पो फौजदार विजय पाटील, 3) पो हवालदार प्रकाश वाघमारे, 4) पो हवालदार सुनील जावळे, 5) पो हवा सुनील वाणी, 6)पो कॉन्स्टेबल सुधीर अहिवळे स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी केली आहे