पुणे : शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला पोलीस ठाण्यात घेऊन जाणारा आणि त्यासोबत सेल्फी घेणारा किरण गोसावी चांगलाच प्रकाश झोतात आला होता. नोकरीच्या फसवणुकीच्या प्रकरणात त्यावर गुन्हे दाखल असून तो सध्या फरार आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी फरार आरोपी किरण गोसावीला फसवणुकीच्या प्रकरणात मदत करणाऱ्या त्याच्या स्वीय सहाय्यक शेरबानो कुरेशीला आज अटक केली आहे.
Maharashtra: Pune Police arrests absconding accused Kiran Gosavi's assistant Sherbano Qureshi in connection with a job fraud case.
— ANI (@ANI) October 18, 2021
याबाबत एएनआय ने अधिकृतरित्या हे वृत्त दिले असून शेरबानो कुरेशीच्या अटकेने किरण गोसावीला शोधण्यास पुणे पोलीसांना मोठी मदत होणार आहे.