आरोग्य

अखेर ‘वानलेस’ १ डिसेंबर पासून पुन्हा रुग्णसेवेत, वेल्लोर शी संलग्न होणार

सांगली : मिरजेतील बहुचर्चित आणि रुग्णसेवेत आपले महत्वाचे योगदान देत आलेली जुनी शतकी परंपरा असलेली डॉ विल्यम वानलेस यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत उभी केलेली वानलेस हॉस्पिटल अर्थात सर्वसामान्य रुग्णांचे मिशन हॉस्पिटल आता १ डिसेम्बर पासून पुन्हा रुग्णसेवेत दाखल होणार असून नक्कीच हि मिरज सांगली तसेच जिल्ह्यासाठी चांगली बातमी ठरणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटांचा सामना करत अनेक टीकांचे लक्ष बनून राहिलेले मिशन हॉस्पिटल हे आता वेल्लोर रुग्णालयाशी संलग्न होत आहे. तामिळनाडू स्थित वेल्लोर रुग्णालयाने या रुग्णालयाची पाहणीही केली होती. नुकतेच दिल्ली येथे चर्च ऑफ नॉर्थ इंडिया या सर्वोच्च संस्थेकडून या निर्णयास हिरवा कंदील मिळाल्याने या रुग्णालयातील कर्मचारी आणि व्यवस्थापनाने सुटकेचा निश्वास सोडला. आपले ‘वानलेस’ परंत सुरु होतं असल्याची बातमी या रुग्णालय आवारात येऊन धडकातच कर्मचाऱ्यांना एकच आनंद झाला.

गेल्या वर्षाहून अधिक काळापासून वानलेस हॉस्पिटल आर्थिक संकटांशी सामना देत आहे. कित्तेक महिने येथील पगार नसल्याने काम बंद होते परिणामी रुग्णालय बंद पडले होते. सुमारे  शतकाहून अधिक परंपरा असलेले हे रुग्णालय अगदी लयास गेले होते. आता मात्र चर्च ऑफ साऊथ इंडियाच्या संलग्नतेमुळे वेल्लोर रुग्णालय या रुग्णालयाचे कामकाज सांभाळणार असून एकप्रकारे नवसंजीवनी या रुग्णालयाला मिळणार आहे. वेल्लोर रुग्णालय हे ‘वानलेस’ च्या तुलनेने कित्तेक पटीने जास्त आहे. तसेच अनेक कुशल डॉक्टर आणि नर्सेस चा स्टाफ अधिक आहे याचाही फायदा या रुग्णालयाला होणे अपेक्षित आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

11 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago