दिवाळी सणानिमित्त वाहनांचा ‘टोल’ माफ करा – खा.सुप्रिया सुळे यांची मागणी

पुणे : राज्यात वाहनांना टोलमाफि व्हावी, टोलमध्ये सूट मिळावी यासाठी अनेक आंदोलने झाली मात्र तरीही संपूर्ण टोलमाफी कधी झालीच नाही. आजही अनेक महामार्गांवर वाहनांना मोठ्या प्रमाणावर टोल आकारला जातो.

यासाठी आता बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही टोलमाफिसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे मागणी केली असून त्यांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने टोलमाफि देण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी, दिवाळी सणाच्या निमित्ताने लोक शहरांतून आपापल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. त्यांचा हा प्रवास आणखी आनंददायी करण्यासाठी राज्यातील सर्व टोलनाक्यांवर दिवाळीच्या काळात टोलमाफी व्हायला हवी अशी जनतेची मागणी आहे. तरी माझी केंद्र व राज्य सरकारला नम्र विनंती आहे की, कृपया आपण या मागणीबाबत सकारात्मक विचार करावा.

अशी विनंती खासदार सुळे यांनी करताना याबाबत नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना फेसबुक च्या माध्यमातून केली आहे. खा.सुप्रिया सुळे यांची मागणी मान्य होते का लवकरच समजणार आहे.