Categories: राजकीय

दौंड नगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ! नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांची उडाली झोप

नगरपालिका निवडणूक विशेष

दौंड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी (upcoming nagarpalika election) असणारी मतदारांची प्रारूप यादी (voter list) नगरपालिकेने मतदारांसाठी व इच्छुक उमेदवारांसाठी प्रसिद्ध केली आहे. शहरातील सर्वच्या सर्व 13 प्रभागांमधील मतदार यादी मध्ये प्रचंड गोंधळ व चुका असल्याचे नगरसेवक पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून सांगण्यात येत आहे. (Big problems in voter list issues nagarpalika)

मा. नगरसेवक राजू बारवकर यांनी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभाग मतदार यादीवर हरकती व सूचना या विषयांना अनुसरून प्राधिकृत अधिकारी( मतदार यादी हरकती व सूचना)व मुख्याधिकारी यांना मतदार याद्या अद्ययावत करण्यात याव्यात म्हणून पत्र दिले आहे. बारवकर यांनी पत्रामध्ये असे नमूद केले आहे की, उपरोक्त विषय व संदर्भा नुसार सूचना व हरकत नोंदवतो की, दौंड नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी नगरपालिकेने दिनांक 21 जून 2022 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली असून या प्रारूप प्रभाग मतदार यादी वर दिनांक 21 जून 2022 ते 27 जून 2022 पर्यंत हरकती व सूचना अर्ज करण्याचे काल मर्यादा निश्चित केली होती.

मतदारांनी हरकती व सूचना नोंदविताना आपण शासनाचे परिपत्रक आवश्यक त्या सर्व ठिकाणी प्रसिद्ध केले होते. मतदारांनी त्या परिपत्रकातील सूचनांनुसार हरकती व सूचना दाखल केल्या होत्या परंतु शासनाने संबंधित परिपत्रक दिनांक 24 जून 2022 रोजी प्रसिद्ध केले असून दिनांक 25 व 26 जून रोजी नियमित सुट्टी असल्यामुळे व सोमवार दिनांक 27 जून ही हरकती व सूचनेची अंतिम तारीख असल्यामुळे सदरील परिपत्रक दौंड नगरपालिकेने नियुक्त केलेल्या ठिकाणी प्रसिद्ध न केल्यामुळे त्या परिपत्रकातील सूचनेप्रमाणे हरकती व सूचना मतदारांना दाखल करता येणे शक्य झाले नाही.

वास्तविक पाहता हरकती व सूचनांचा जो कालावधी निश्चित केला गेला होता त्याच कालावधीत मतदारांना सर्व प्रकारे मार्गदर्शन व सूचना करणे क्रमप्राप्त असताना आपण सदरील पत्रक सुट्टीला संलग्न असलेल्या तारखेस प्रसिद्ध करून कायद्याने कालमर्यादेचे जे नैसर्गिक नियम आहेत त्याचे उल्लंघन केले आहे. एकंदरीतच शासन मनमानी पद्धतीने केलेल्या मतदार याद्या लादण्याच्या उद्दिष्टाने सदरील कार्यप्रणाली दिसून येत आहे. सदरील प्रकार संविधानिक व बेकायदेशीर असून लोकशाहीला मारक आहे त्यामुळे मतदारांनी केलेल्या सर्व हरकती व सूचनांचा योग्य विचार करून निर्णय घ्यावा. राज्य निवडणूक आयोगाची ही कार्यप्रणाली बेकायदेशीर, असंविधानिक व निश्चित काल मर्यादेचे उल्लंघन करणारी असून त्यामुळे त्यांनी परी पत्रकान्वये हरकती व सूचना करताना अपेक्षित असलेले मुद्दे व सूचना पाळताना मतदारांना अडचणीचे होणार असून मतदारांना अत्यंत कमी कालावधी (3 ते 4 तास) परिपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर मिळाला असून एवढ्या वेळात मतदार पुरावे गोळा करू शकत नाही. त्यामुळे हरकती व सूचनांची कालमर्यादा वाढवून देण्यात यावी अशी मागणी पत्रातून बारवकर यांनी केली आहे.

विधानसभेच्या मतदार यादी मध्ये नमूद असलेले सेक्शन ॲड्रेस हे अनेक प्रभागातील मतदारांचे असल्यामुळे मतदार यादी चे केलेले विभाजन हे स्थळ पाहणी न करता केलेले असल्यामुळे एका सेक्शन ऍड्रेस मधील कोणत्यातरी एकाच प्रभागात समाविष्ट केल्यामुळे प्रभाग रचना नकाशा प्रमाणे नसून सेक्शन ऍड्रेस मधील मतदार दोन वेगवेगळ्या प्रभागांमध्ये असल्यामुळे त्याची स्थळ पाहणी करून नियमित व प्रचलित पद्धती अन्वये मतदार यादीचे विभाजन करून योग्य त्या मतदार याद्या अद्यावत कराव्यात आणि त्यासाठी कोणत्याही मतदार, संघटना, पक्ष यांच्या हरकती व सूचनांची अपेक्षा न करता महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील दोन्ही संदर्भीय पत्रान्वये प्रभाग मतदार याद्या अद्यावत करण्यात याव्यात असेही बारवकर यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.

विधानसभा मतदार यादीतील मतदारांची नावे सेक्शन ऍड्रेसनुसार जर दुसर्‍या प्रभागात जात असतील तर नकाशा प्रमाणे ती इमारत, गल्ली, वाडे, ज्या प्रभागांच्या सीमारेषेत अथवा नकाशात येतो त्या प्रभागातच ती नावे स्थळ पाहणी करून समाविष्ट करावीत अशी मागणी सुद्धा होत आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

5 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

7 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago