अख्तर काझी
दौंड : छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांचा इतिहास नवीन पिढीने सुद्धा समजावून घ्यावा या उद्देशाने व दीपावली निमित्ताने येथील मुंजाबा सेवा प्रतिष्ठान व रोहित राजेश पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीने किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 39 शिवप्रेमी स्पर्धकांनी भाग घेतला.
येथील विठ्ठल मंदिर परिसर ग्रुपने साकारलेल्या किल्ल्याला प्रथम पारितोषिक देण्यात आले. आमदार राहुल कुल यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी पो. निरीक्षक विनोद घुगे, मा.नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ऍड. सुधीर पाटसकर, मा. नगरसेवक नंदू पवार ,बबलू कांबळे तसेच अमोल काळे,सुनील पवार, अकबर सय्यद ,भरत बागल, राजेंद्र ओझा, राजू गजधने, रुपेश बंड, सागर पाटसकर ,गणेश जगदाळे ,आबा जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेमध्ये कानगाव येथील शिवाज्ञा ग्रुपने दुसरा तर एस आर पी एफ गट नंबर 5( रुग्णालय) यांनी तिसरा क्रमांक पटकाविला.
आमदार राहुल कुल, प्रेमसुख कटारिया, सुधीर पाटसकर, नंदू पवार, कुमार साईराज वाल्मिकी यांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांचा इतिहास व त्यांच्या गडकिल्ल्यांविषयी मोलाची माहिती दिली. कार्यक्रमाचे आयोजन रोहित पाटील यांनी केले, सूत्रसंचालन शिवाजी रसाळ यांनी केले. विकास देशपांडे, प्रमोद काकडे, केदार इंगळे, उमेश कांचन ,नागेश जाधव, दत्तू बंड, मुसा अत्तार ,रजनीश शिंदे, सुदाम परकाळे, गोरख सोनवणे, निखिल मूलचंदानी, राजू धिरडकर, श्याम चुन्नूर व सुरेखा नागटिळक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.