आमदार राहुल कुल यांना ‛क्लीन चिट’ मिळाल्यानंतर ‛वरवंड’मध्ये ग्रामस्थांकडून जल्लोष

दौंड : भीमा पाटस सहकारी साखर कारखाना गैरव्यवहार प्रकरणी आमदार राहुल कुल यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर दौंड तालुक्यातील वरवंड या गावात ग्रामस्थांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. आमदार राहुल कुल यांच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले होते.

राज्यसरकारकडून परीक्षण अहवालामध्ये ते सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. याबाबतची माहिती काल लक्षवेधी दरम्यान राज्यसरकारकडून विधानसभेत देण्यात आली होती. राज्यसरकारकडून आ.कुल यांना क्लीन चिट देण्यात आल्यानंतर वरवंड ग्रामस्थांच्या वतीने फटाके फोडून व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून एकच जल्लोष करण्यात आला.

याप्रसंगी भीमा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष नामदेव बारवकर, संचालक एम. डी. फरगडे, माजी संचालक गोरख दिवेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती दौंड चे संचालक अशोक फरगडे, खरेदी विक्री संघाचे संचालक सचिन सातपुते, तुषार दिवेकरपाटील, दादा काळे, सोसायटीचे संचालक, सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.