दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव-बोरीपार्धी या गावांतील सोशल मीडियावरील ग्रुपवर सिरिया-इराक मधील खतरनाक आतंकवादी संघटना ‛इसिस’ चे रक्तरंजीत कारवायांचे व्हिडीओ टाकून लोकांमध्ये अफवा, भीती, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे आणि त्यातून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत.
एकतर या संघटनांचा मुख्य उद्देशच हा असतो की, आपल्या रक्त रंजित कारवायांचे व्हिडीओ जगभरात व्हायरल करून लोकांच्या मनामध्ये भीती आणि दहशत निर्माण व्हावी. त्यातच या दहशतवादी संघटनांचे रक्तरंजीत व्हिडीओ स्वतःच्या गावातील आणि परिसरातील सोशल मीडिया ग्रुपवर टाकून काही लोक या दहशतवाद्यांचे दहशत पसरविण्याचे काम अधिक सोपे करत आहेत हेही यांना समजत नाही अशी प्रतिक्रिया उमटत आहे. त्यामुळे बाहेरी देशात झालेल्या आतंकवादी कारवायांचे व्हिडिओ गावांतील सोशल मीडिया ग्रुपवर प्रसिद्ध करणाऱ्यांवर कारवाई होऊन या प्रकारांना आळा बसणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
त्यातच असल्या रक्तरंजीत व्हिडिओला सोशल मीडिया ग्रुपवर टाकण्यात आल्यानंतर काहीजण आपली राजकीय स्वार्थाची पोळी भाजून घेण्यासाठी अशा गोष्टींना पाठिंबा दर्शवित खतपाणी घालतानाही दिसत आहेत.