दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यामध्ये सध्या गुऱ्हाळांमुळे प्रदूषण वाढत असल्याचे समोर येत असताना आता या गुऱ्हाळांमध्ये खाण्याच्या गुळामध्ये एक्सपायरी डेट संपलेले चॉकलेट तेही अळ्या पडलेले वापरले जात असल्याची माहिती समोर येत असल्याने मोठी खळबळ माजली आहे.
याबाबत राजाभाऊ तांबे यांनी ‛सहकारनामा’शी बोलताना याची माहिती दिली.
व्हिडीओ – गुळामध्ये वापरला जातोय एक्सपायर झालेला माल
राजाभाऊ तांबे यांनी यावेळी आरोप करताना खाण्याच्या गुळामध्ये सडलेले, अळ्यापडलेले आणि एक्सपायरी डेट संपलेले चॉकलेट वापरले जात असल्याने याचा विपरीत परिणाम हे गुळ खाणार्यावर होत असल्याचे सांगून अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई वेळीच केली तर निश्चित असले प्रकार रोखले जातील असे सांगितले.