मुंबई : भारत या टोपण नावाने ओळखले जाणारे जेष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालं आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
देशभक्तीपर चित्रपटांसाठी ते प्रसिद्ध होते. भारत कुमार या टोपणनावाने ते ओळखले जायचे. हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक उत्तम चित्रपट देणारे बॉलिवूडचे सुपरस्टार मनोज कुमार यांनी आपल्या चित्रपटांमधून लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागवण्यास मदत केली. मनोज कुमार हे हिंदी चित्रपटांमध्ये देशभक्त अभिनेत्याचा चेहरा म्हणून ओळखले जायचे.
मनोज कुमार यांनी क्रांती, ‘संतोष’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘बे-इमान’, ‘कलयुग और रामायण’, ‘अनिता’, ‘आदमी’ यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.