Categories: क्राईम

आळंदीत 12 वर्षीय विद्यार्थ्यावर बलात्कार

पुणे : पुण्यातील आळंदीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दि. 17 ऑगस्ट रोजी आळंदी येथे एका कर्मचाऱ्याने ज्याला महाराज या नावाने मुले मान देत होती त्याने आपल्याच खासगी वारकरी शिक्षण संस्थेतील 12 वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला आहे. व्यंकटेश काशिनाथ माळनूर असे त्याचे  नाव आहे.

ही घटना 17 ऑगस्ट रोजी शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. आळंदी पोलिसांनी व्यंकटेश काशिनाथ माळनूर याला अटक केली आहे. या अगोदर सुद्धा जानेवारी महिन्यात तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. एका प्रतिष्ठित महाराजाने हे कृत्य केले होते.

शिंदे, फडणवीस अटक प्लॅन

मिळालेल्या माहितीनुसार आळंदीत असणाऱ्या एका अन्नदान संस्थेमध्ये शनिवारी पहाटेच्या सुमारास या कर्मचाऱ्याने या बारा वर्षाच्या मुलाला तो झोपलेल्या अवस्थेत असताना त्यास उचलून टीव्ही च्या खोलीत नेले. त्यानंतर त्याला तसेच मोबाईल खेळायला देऊन त्याच्यावर अनैसर्गिकरित्या बलात्कार केला. या कृत्याला तो मुलगा विरोध करू लागल्यानंतर त्याने त्या मुलाला गप्प बसून सर्व शांतपणे सहन कर असे म्हणत त्याच्यावर पाशवी बलात्कार केला असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

आळंदि पोलिसांनी या नराधमावर बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम कलम ४, ६ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ज्या इमारतीत ही घटना घडली त्या इमारतीत शालेय शिक्षण देणारी संस्था, वारकरी विद्यार्थी आणि अनाथ मुलांची संस्था, ग्रंथालय अशा विविध संस्था एकाच इमारतीत आहेत. एका महाराजाच्या निगराणीत या संस्थाचा कारभार चालत आहे. यामुळे अशा घटनेनंतर तेथिल अन्य मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे

Team Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

3 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

3 दिवस ago

रेल्वे रुळावर दगड ठेवून घातपात घडवून आणणाऱ्या दोन सराईतांना अटक, 26 वर्षापासून पोलिसांना देत होते गुंगारा

रेल्वे रुळावर दगड ठेवून घातपात घडवून आणणाऱ्या दोन सराईतांना अटक, 26 वर्षापासून पोलिसांना देत होते…

4 दिवस ago