दौंड : दौंड शहरातील एका भागामध्ये कचरा कुंडीत मृत अर्भक आणि मानवी अवयव सापडल्याची घटना घडल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. ही घटना गंभीर असून आता विविध स्तरातून या घटनेच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.
अशीच एक मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. यावेळी वैशाली नागवडे यांनी बोलताना, प्रसार माध्यमांद्वारे मिळत असलेल्या माहितीनुसार प्लॅस्टिक बरण्यांमध्ये मृत अर्भक आणि मानवी अवयव मिळून आलेले आहेत. मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडवणवीस साहेब व उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित दादा पवार साहेब यांना विनंती आहे की ह्या प्रकरणाचा तपास व्हावा व सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी वैशाली नागवडे यांनी केली आहे.
वैशाली नागवडे यांनी अर्भक कुठून आले व दौंड तालुक्यातील सर्व गर्भपात सेंटर ची चौकशी व्हावी अशीही मागणी केली असून मानवी अवयव (Human Body Parts) असले तरी ते कोठून आणले गेले, त्याची परवानगी आणि त्याच्या नोंदी तपासून हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि जैव वैद्यकीय कचरा (Bio Medical Waste) चे सर्व नियम धाब्यावर कोण बसवत आहे याचा पण तपास व्हावा असे म्हटले आहे.