पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस वैशाली नागवडे आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांच्यामध्ये सध्या राजकीय शीतयुद्ध सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. वैशाली नागवडे ह्या जरी उघडपणे रमेश थोरात यांचे नाव घेत नसल्या तरी जिल्हा बँकेच्या निवड प्रक्रियेत त्यांना डावलले गेल्यानंतर या दोघांमधील राजकीय वाद विकोपाला गेल्याचे स्पष्ट दिसत आहे.
या सर्व वादावादीतून नुकतीच वैशाली नागवडे यांची एक फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. जीच्यामध्ये त्यांनी ‛मी कुठे कमी पडले’ असे लिहीत आपली खंत व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांमध्ये आपले परखड मत व्यक्त करताना त्यांना राजकारणातून संपविण्याचा डाव काहीजण करत असल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी पक्षात असणारे काही लोक आपली कश्या प्रकारे घुसमट करत आहेत आणि आपण त्यांना कसे सामोरे उत्तर देणार आहोत हेच यात आवर्जून सांगितले आहे.
वैशाली नागवडे यांनी पवार साहेबांनी महिला धोरण आणले आणि त्यानंतर महिला राजकारणात स्थिर झाल्या असे सांगत आदरणीय पवार साहेब, दादा आणि सुप्रिया ताईंनी मला दूध संघाचे चेअरमन केलं हे माझ्यासाठी खूप मोठं होतं. महीलांविषयी आदरणीय पवार साहेबांचे जे धोरण आहे ते ग्राउंड लेवलपर्यंत राबविले गेले पाहिजे. मात्र काहीजण तसे करताना दिसत नाहीत तर महिला आरक्षण आले की महिलेला चार-पाच वर्षे राजकारणात आणायचे आणि नंतर तिला घरी बसवायचे हे धोरण काहीजण राबवत असतात. पण फक्त पाच वर्षे राजकारण करून घरी बसणाऱ्यातली मी नाही. त्यामुळे गेली 21 वर्षे मी पवार साहेबांच्या आशीर्वादाने राजकारणात टिकून आहे असे म्हणून त्यांनी जे मला त्रास देऊन घरी बसविण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना मी एकदिवस नक्कीच घरी बसवेल पण मी घरी बसणार नाही. मी दुसऱ्यांसारखे राजकीय स्वार्थासाठी पक्ष बदलले नाही असे परखड मत त्यांनी व्यक्त केले आहे.
नुकतीच जी जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे त्याबद्दल बोलताना त्यांनी जिल्हा बँकेमध्ये महिला संचालकांसाठी 2 जागा आहेत आणि यात 25 महिलांनी अर्ज केले होते. मात्र आम्ही इतकी वर्षे राजकारणात सक्रिय असताना आम्हाला काही मंडळींकडून डावलले जात आहे. त्यामुळे कुठल्याही ठिकाणी एखाद्याची बायको म्हणून एखाद्याची निवड व्हायला नको तर एखादी महिला सक्षम आहे त्यामुळे तिची निवड होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राजकारणात महिलांमध्ये सहनशीलता अण संघर्ष करण्याची तयारी हवी. अर्ध्यावर राजकारण सोडणे हे माझ्या रक्तात नाही. नेतृत्व विरोधात बंड करणार नाही, पण जे पक्षात राहून महिलांची मुस्कटदाबी करतात त्यांच्या विरोधात नक्कीच बंड करणार असल्याचे शेवटी त्यांनी म्हटले आहे.
जिल्हापरिषद निवडणुकीत आ.राहुल कुल गटाकडून ऑफर होती पण..
2017 ला जिल्हा परिषदेची निवडणूक झाली त्यावेळी विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या गटातून ऑफर होती. व मी तिकडून निवडून येऊन पुन्हा इकडे यावे असेही काहींनी सुचवले होते पण मी त्यावेळी पक्षाशी एकनिष्ठ राहून ती ऑफर स्वीकारली नाही. स्वार्थासाठी पक्ष बदलणारी मी नाही.