आरोग्य सेवक-सेविका, तंत्रज्ञ, औषध निर्माता, पर्यवेक्षक या 5 संवर्गातील 10 हजार 127 रिक्त पदांची भरती

मुंबई

ग्रामविकास विभागाच्या अखत्यारितील जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या ५ संवर्गातील एकूण १० हजार १२७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली.

जिल्हा परिषदेतील या ५ संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त झालेले असून यासंदर्भातील भरती प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हा निवड समितीमार्फत करण्यात येत असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.