बेपत्ता वाहन डीलर राजेंद्र म्हस्के यांचा ‘खून’, ‘मुलगाच’ बनला ‘बापाचा’ कर्दनकाळ मात्र यवत पोलिसांनी अखेर खुन्याला शोधलेच

दौंड

दौंड तालुक्यातील केडगाव-चौफुला येथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री करणारे राजेंद्र म्हस्के नावाचे डीलर हे या गेल्या 9 दिवसांपासून चौफुला येथून अचानक बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ माजली होती. त्यांच्या अचाननक बेपत्ता होण्याने या परीसरात चर्चेला उधाण आले होते मात्र त्यांचा मृतदेह येडशी येथील अभयारण्यात सापडला असून त्यांचा खून झाला असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. त्यांचा खून हा त्यांच्या मुलानेच केला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासातून पुढे येत आहे. म्हस्के त्यांच्यावर रविवारी पहाटे पाटेठाण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेंद्र म्हस्के हे गेल्या 9 दिवसांपूर्वी ऑफिसला जातो असे म्हणून सकाळी घरून ऑफिसला गेले होते मात्र ते पुन्हा घरी आलेच नाही. म्हस्के यांच्या पत्नीने त्यांना फोन केला मात्र ते फोन उचलत नसल्याने त्यांच्या घरातील लोकांनी त्यांना चौफुला येथील ऑफिसवर जाऊन पाहणी केली त्यावेळी त्यांचा फोन आणि पॉकेट हे त्यांच्या ऑफिसमध्येच आढळून आला त्यामुळे ते हरवल्याची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात दिली होती.

पोलीस त्यांचा शोध घेत होते मात्र राजेंद्र म्हस्के हे असे अचानक कुणाला काहीही न सांगता निघून जाने अशक्य आहे असे मत त्यांच्या नातेवाईकांचे येत होते. त्यामुळे त्यांच्या सोबत काही बरे वाईट झाले असावे अशी संशयाची पाल त्यांच्या कुटुंबीयांत चुकचूकत होती. येडशी येथे सापडलेला मृतदेह हा त्यांचाच असून त्यांचा खून झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली असून पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहा.पोलीस निरीक्षक वाबळे व त्यांच्या पथकाने या खुनातील आरोपीस जेरबंद केल्याची माहिती मिळत आहे. या बाबत सविस्तर वृत्त थोड्याच वेळात प्रसिद्ध करीत आहोत.