– सहकारनामा
दौंड :
आज दि.10 एप्रिल रोजी दुपारनंतर दौंड तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरू असून लॉकडाउन निमित्ताने घरात बसून असलेले नागरिक याचा आनंद घेत आहेत.
अवकाळी पाऊस सुरू झाल्याने राज्यात सध्या हवामान आपल्या मर्जीप्रमाणे वागत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण पावसाचा मुख्य हंगाम हा जून ते ऑक्टोबर असा गृहीत धरला जात होता मात्र आता कोणत्या महिन्यात कोणता ऋतू येईल याची शाश्वतीच राहिलेली नाही.
एप्रिल महिना उजाडताच राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळीशी पार केला होता. त्यानंतर आता संबंध महाराष्ट्रातील कमाल तापमानात चांगलीच घसरण झाली होती त्यामुळे येत्या काही दिवसांत पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्याचा प्रत्यय आज येत असून राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामध्ये मराठवाडा, कोकण आणि विदर्भाचा समावेश असून गारपीटीसह जोरदार पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने अगोदरच वर्तवली आहे.