Categories: सांगली

महापालिकेच्या महासभेत अभूतपूर्व गोंधळ, माजी महापौरांनी भर सभेतच टराटरा फाईल फाडल्या

सुधीर गोखले

सांगली : सांगली,मिरज,कुपवाड येथील महापालिकेच्या महासभेत अभूतपूर्व असा गोंधळ बघायला मिळाला असून नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी विकासकामांच्या फाईल महासभेत दाखवत यावर अधिकाऱ्यांच्या सह्या कधी होणार असा सवाल उपस्थित केला तर माजी महापौर नगरसेवक विवेक कांबळे यांनी या फाईल्सच फाडून टाकल्यामुळे सभागृहात अभूतपूर्व असा गोंधळ निर्माण झाला. 

या महासभेत थोरात यांनी महापौर व प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न करताना ‘महापौरांचा कोट्यवधींचा निधी खर्ची पडला, अन्य पदाधिकाऱ्यांचाही कामे मंजुर झाली. मात्र नगरसेवकांची २० लाखांची कामे अद्याप मंजुर नाहीत. अधिकारी विलंब करीत आहेत. मुख्य लेखापाल आठ दिवस रजेवर आहे. त्यांच्या पदभार अन्य कोणा अधिकाऱ्यांकडे दिला नाही. त्याच्या सहीसाठी कामे अडली आहे असा मुद्दा उपस्थित केला.

त्यानंतर थोरात यांनी अशा कामांच्या पाच फायली सभागृहात सादर केल्यानंतर भाजपचे नगरसेवक विवेक कांबळे यांनी थोरात यांची कृती बेकायदेशीर असल्याचे सांगत कांबळे यांनी अशा फायली नगरसेवकाने आणणे बेकायदेशीर आहे. ते नगरसेवक आहेत की शिपाई? असा प्रश्न उपस्थित केला त्यावेळी दोघांत जोरदार खडाजंगी सुरु झाली. महापौरांनी दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न मात्र अशा फायली सभागृहात आणल्यास फाडून टाकण्याचा इशारा कांबळे यांनी दिला. त्यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर म्हणून थोरात यांनी मग आत्ताच फाडा असे म्हणताच कांबळे यांनीही त्या फाईल्स भर सभेत टराटरा फाडल्या.

अशी झाली वादाला सुरुवात…

आज महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली मनपा ची महासभा पार पडली नगरसेवक योगेंद्र थोरात सुरवातीलाच चांगलेच आक्रमक पाहायला मिळाले. महापौरांसह पदाधिकाऱ्यांची कामे मंजूर झालेली आहेत मग आमच्या सारख्या नगरसेवकांचे काय?  असा प्रश्नच त्यांनी केला. अर्थसंकल्पात तरतूद असलेल्या लाखो रुपयांच्या कामांना अद्याप मंजुरी मिळाली नाही  आम्ही सादर केलेल्या विकासकामांच्या फाईल वर सही करण्यास अधिकारी वर्ग विलंब करतात. नगरसेवकांना अशा फाईल वर सही साठी हेलपाटे मारावे लागत असतील तर सामान्य नागरिकांची काय अवस्था होत असेल. आज नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी विविध विकासकामांच्या अशा पाच फाईल्स आज सभागृहात सादर केल्या यावेळी माजी महापौर आणि नगरसेवक विवेक कांबळे यांनी नगरसेवक थोरात हे या फाईल घेऊन सभागृहात आले हि हि त्यांची कृती बेकायदा असल्याचे सांगताच दोघांमध्ये वादंग निर्माण झाला.

त्यात या फाईल्स सभागृहातच फाडून टाकू असा इशाराच इथे दिला त्यावर नगरसेवक थोरात यांनी ‘आता इथेच या फाईली फाडून टाका’ असे म्हणत चक्क या फाईली विवेक कांबळे यांच्याकडे फेकल्या यावर माजी महापौर आणि नगरसेवक विवेक कांबळे यांनी यातील दोन फाईली फाडल्या आणि परत सभागृहात गोंधळ सुरु झाला. महापालिकेच्या सभागृहात विकासकामांच्या फाईल्स फाडल्याबद्दल नगरसेवक विवेक कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरसेवक थोरात यांनी केली आहे.

‘आपण जनतेसाठी आहात त्याच्यासाठी महापालिकेमध्ये येता याचे भान ठेवा’ आयुक्त पवार
आजच्या या झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर आयुक्त सुनील पवार चांगलेच संतापले तर आपण जनतेसाठी त्यांच्या प्रश्नांसाठी या सभागृहात येता याचे भान ठेवा समाजमाध्यमांवर आपल्या प्रसिद्धी साठी छायाचित्रे जावीत यासाठी काही नगरसेवक नेहमी धडपडत असतात पण त्यांनी जनतेसाठी आपण या सभागृहात येतो याचे भान ठेवावे अशा तीव्र शब्दांमध्ये आजच्या प्रकारावरून कान टोचले. जरी या सभागृहाची मुदत १९ ऑगस्ट रोजी संपत असली तरी आपल्या विकासकामांची यादी द्यावी मुदत संपल्यानंतरही त्यांच्या कामांसाठी  प्राधान्य आपण नक्की देऊ. असेही आयुक्तांनी यावेळी सभागृहात सर्व नगरसेवकांना आश्वासित केले.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

5 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

7 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

9 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago