राजकीय – अब्बास शेख
केडगाव (दौंड) : दौंड तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायत निवडणूक विविध राजकीय डावपेचांनी गाजत असताना आता थोरात गटानेही राजकीय डावपेच ओळखून एकजूट केली आहे. थोरात गटाची केडगाव येथील पद्मावती मंदिरामध्ये बैठक होऊन सर्वानुमते वनिता संताजी (मनोज) शेळके यांना सरपंचपदाच्या उमेदवारीसाठी जाहिर पाठिंबा देण्यात आला आहे. यावेळी थोरात गटातीलच सरपंचपदाच्या उमेदवार अंकिता धनंजय शेळके यांनी वनिता संताजी (मनोज) शेळके यांना जाहिर पाठिंबा दिला असल्याचे जाहीर केले आहे.
थोरात गटात फूट पाडण्यासाठी मोठे षडयंत्र आणि कार्यकर्त्यांचा राग अनावर.. काहींनी थोरात गटात येऊन त्यांचा विश्वास संपादन करत विविध वार्डमधील मुख्य उमेदवारांना माघार घेण्यास लावली आणि ऐनवेळी आपला स्वतःचा वेगळा पॅनल तयार केला. ही गद्दारी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर थोरात गटातील कार्यकर्त्यांना समजली त्यामुळे थोरात गटातील कार्यकर्ते कमालीचे चिडल्याचे दिसले. विश्वास संपादन करून पाठीत खंजीर खुपसण्यात आल्याची भावना ते बोलून दाखवू लागले आणि आतातरी एकत्र या, धोका झाला असला तरी एक होऊन उत्तर द्या असा आवाज सर्वत्र घुमू लागला. त्याच पार्श्वभूमीवर बैठक बोलविण्यात येऊन सर्वांनी एकत्र लढण्याचा निर्धार केला.
थोरात गटाची बैठक आणि सरपंचपदाच्या उमेदवाराला सर्वानुमते पाठिंबा.. केडगाव येथील पद्मावती माता मंदिर येथे थोरात गटाची बैठक दि. 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7:00 वाजता पार पडली. या बैठकीसाठी तुषार उर्फ गणेश रमेश थोरात हे उपस्थित राहिले. त्यांनी सर्व उपस्थित कार्यकर्ते आणि उमेदवारांशी चर्चा करून वनिता संताजी (मनोज) शेळके यांना अंकिता धनंजय शेळके यांनी सरपंचपदाच्या उमेदवारीस जाहीर पाठिंबा दिला असल्याचे जाहीर करत सर्वांनी वनिता संताजी (मनोज) शेळके या सरपंचपदाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.
या बैठकीला जेष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत शेळके-पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती झुंबर गायकवाड, मार्केट कमिटीचे संचालक सुनिल निंबाळकर, राजेंद्र मलभारे, धोंडिबा शेळके, मल्हारी बाबासो हंडाळ, संताजी (मनोज) शेळके, धनंजय (बापू) शेळके, दिलीप हंडाळ, राजेंद्र शेळके, सचिन शेळके, नितीन कुतवळ, दादा बारवकर, निवृत्त पोलिस अधिकारी मोहन देशमुख, ज्ञानेश्वर माऊली शेळके, ज्ञानदेव गायकवाड, दत्ता शेळके सर, माणिक टेंगले, संतोष कडू देशमुख, सुरेंद्र हाडके, दत्तात्रय कडू, रोहित गजरमल, पोपट शेंडगे, शंकर बेळगळ, दत्तात्रय निंबाळकर, बबन बेनगुडे, बबन तळेकर, भाऊ धुमाळ यांसह केडगाव ग्रामपंचायतच्या सर्व सहा वार्डमधील थोरात गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.