‛भारत-पाकिस्तान’ क्रिकेट सामन्याला केंद्रीयमंत्री ‛रामदास आठवले’ यांचा ‛विरोध’

पुणे : भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये सध्या तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीरमध्ये जवानांवर झालेल्या हल्ला आणि त्यानंतर झालेला सर्जिकल स्ट्राईक यामुळे या दोन्ही देशांचे संबंध बिघडून अजूनही मोठा तणाव दिसून येत आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांमध्ये होत असलेले T-20 विश्वचषक क्रिकेटच्या सामन्यांवर आता केंद्रातील मंत्र्यांकडूनही टीका होताना दिसत आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये होणाऱ्या समान्यांनावर आक्षेप घेतला असून त्यांनी याबाबत वृत्तएजन्सी ANI समोर याबाबत आपले मत मांडताना प्रखरपणे आपला विरोध दर्शविला आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ANI शी बोलताना भारताने पाकिस्तानशी सामना करणे चुकीचे आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना (आगामी टी -20 विश्वचषक) थांबवावा. आमच्या खेळाडूंनीही पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिला पाहिजे. मी याबाबत केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांना लिहीन असे मत पुणे येथे आल्यानंतर त्यांनी मीडियाशी बोलताना मांडले आहे.