दौंड शहरातील भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामाला सुरुवात, आ. राहुल कुल यांच्या प्रयत्नाने 2 कोटी 24 लाख निधी मंजूर

अख्तर काझी

दौंड : दौंड शहराला योग्य दाबाने व अखंडितपणे वीज पुरवठा व्हावा यासाठी दौंड उपकेंद्रातून निघणाऱ्या 22 के.व्ही. (दौंड शहर) विद्युत वाहिनी भूमिगत करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. आमदार राहुल कुल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी मा. नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया ,महावितरण चे कार्यकारी अभियंता संदीप दरवडे, उपकार्यकारी अभियंता विक्रम चव्हाण, दौंड शहर अभियंता बशीर देसाई तसेच भाजपाचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे, मा. नगरसेवक फिलिप अँथोनी, बबलू कांबळे, शहानवाज पठाण ,नितीन कांबळे, राजू बारवकर ,दिलीप डहाळे ,अमोल काळे, अकबर सय्यद, फारुख कुरेशी, धरम बनसोडे, अमर जोगदंड, निलेश काळे ,विशाल माशाळकर ,नागेश बेलूरकर, प्रमोद राणेरजपूत व कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर कामाकरिता एकूण 2 कोटी 24 लाख रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी 32 लाख डीपीडीसी फंडातून व एक कोटी 92 लाख रुपये महावितरणच्या आर अँड एम या योजनेतून सदरचे काम करण्यात येणार आहे. पोकार मिल ते पोलीस स्टेशन तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यानासमोरील कुरकुंभ फिडरच्या उच्च वाहिनी भूमिगत करण्याच्या कामास आज सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती शहर अभियंता बशीर देसाई यांनी दिली, ते म्हणाले की सदरचे भूमिगत केबलचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील ग्राहकांना योग्य दाबाने व अखंडपणे वीजपुरवठा मिळणार आहे.