Categories: आरोग्य

भाचीच्या लग्नात नाचता नाचताच मामाने सोडला जीव, व्हिडीओ झाला व्हायरल

आयुष्यात कधी, कुणाबरोबर काय होईल हे सांगता येत नाही. बदललेले जीवनमान आणि अचानक ओढवणारे मृत्यू हे समिकरण जुळून येऊ लागले आहे. आता हेच पहा ना, आपल्या लग्नात आनंदाने बेफान होऊन नाचणाऱ्या मामाचा आपल्या समोरच मृत्यू होईल हे त्या भाचीला स्वप्नात तरी वाटले असेल का.. पण हा दुर्दैवी प्रसंग तिला आपल्या डोळ्यांनी पहावा लागला आहे.

भाचीच्या लग्नात बेफान होऊन नाचणाऱ्या मामाचे नाव दिलीप राऊतकर असे असून ते पेशाने इंजिनिअर होते. लग्नात उपस्थित नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप राऊतकर हे त्यांच्या भाचीच्या लग्नानिमित्त 4 मे रोजी लग्न मंडपात उपस्थित होते. लग्न सोहळ्यात रात्री उशिरा डान्सपार्टी सुरू होती. या डान्सपार्टी मध्ये दिलीप राऊतकर हेही बेफान होऊन नाचू लागले.

वरील व्हिडीओ मध्ये आपण पाहू शकता की दिलीप राऊतकर हे आपल्या भाचीच्या लग्नामध्ये कसे बेफान होऊन नाचत आहेत. मात्र नाचता नाचताच त्यांना अचानक हृदयाचा त्रास जाणवू लागला आणि ते थोडावेळ खाली बसले. खाली बसल्यानंतर काहीवेळातच ते जागीच कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना लग्नात नाचताना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे लग्न सोहळ्याचे आनंदी वातावरण अचानक दुःखात बदलले आणि आपल्या सोबत नाचणारी व्यक्ती काही वेळातच आपल्याला सोडून गेली यावर कुणाचा विश्वासच बसत नव्हता.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

5 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago