|सहकारनामा|
दौंड : केडगाव ता.दौंड येथील मुख्य बाजारपेठेमध्ये दोन्ही बाजूला अनधिकृतरीत्या केले जात असलेल्या दुचाकी पार्किंगमुळे चारचाकी वाहने तर सोडाच समोरा समोर येणाऱ्या दुचाकींनाही रस्ता मिळणे अवघड होऊन बसले आहे.
केडगाव स्टेशन येथे कायमच केडगाव आणि आजूबाजूच्या गावातील लोक खरेदीसाठी येत असतात.
मात्र दुरून येणाऱ्या या लोकांना आता येथे ट्रॅफिक जाम चा प्रश्न भेडसावू लागला आहे. केडगाव स्टेशन येथे मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाक्या पार्किंग केल्या जातात. या दुचाक्या दिवसभर तेथेच उभ्या असल्याने या दुचाक्यांच्यामधून चारचाकी गाड्या घेऊन जाताना चारचाकी वाहन चालकांना कमालीची कसरत करावी लागते.
अनेकवेळा येथून वाहने जाताना या दुचाक्यांना घासल्याने वादविवादही होत असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. त्यामुळे आता अनधिकृतपणे रस्त्यावर दुचाकी लावणाऱ्यांवर केडगाव पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.