Categories: Previos News

UK मध्ये कोरोनाचा नवा अवताराने हाहाकार.. अनेक देशांनी केली हवाई वाहतूक रद्द, भारताने घेतला ‛हा’ निर्णय



आंतरराष्ट्रीय :

जगाला घरातच बंदिस्त करून ठेवणाऱ्या कोरोनाने पुन्हा आपले डोके वर काढले असून आता कोरोनाच्या विषाणूने आपला नवा रुद्रावतार दाखवत स्वतःचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे युकेमध्ये या कोरोनाच्या नव्या स्वरूपाने संसर्गाचा धोका पुन्हा वाढला असून अनेक देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून या देशात येणारी आणि जाणारी विमान सेवा स्थगित केली आहे.



ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा चेहरा समोर येताच युरोपियन युनियन देशांसह अनेक देश आता युकेशी होणारी हवाई वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेत आहेत. तर काही देशांनी विमानसेवा स्थगितही केली आहे. युकेला जाणारी विमान सेवा स्थगित करण्याचा निर्णय जर्मनी, फ्रान्स आणि इटली, कॅनडा यांनी घेतला आहे.

भारतानेही  31 डिसेंबर पर्यंत युकेची सर्व विमान सेवा रद्द केली आहे. उद्या दि. 22 डिसेंबरपासून ही स्थगित असणार आहे. कोरोनाने व्हायरसने बदललेले रूप हे जास्त धोकादायक असून त्याचा संसर्गवाढीचा  वेग खूपच जास्त आहे. कोरोनाचा बदलेला चेहरा हा हाताबाहेर जाणारा असल्याची माहीती युकेचे आरोग्य सचिव मॅट हॅन्कॉक यांनी दिली आहे.

त्यामुळे या कोरोनाच्या या नव्या अवताराची धास्ती सर्वांनीच घेतली असून या बदलत्या कोरोनाचे रुग्ण हे इटली, डेन्मार्क आणि नेदरलँड्स मध्येही आढळून आले आहेत.

Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

5 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

7 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

9 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago