खेड : शिवसेना चिन्ह आणि नाव गेल्यानंतर आज प्रथमच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोकणातील खेड येथे विराट सभा पार पडली. या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपचा खरपूस समाचार घेतला आहे.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना, ज्यांना आजपर्यंत जे दिलं ते खोक्यात बंद झाले. जे भुरटे, चोर, गद्दार, आहेत त्यांना शिवसेना नाव, धनुष्य बाण पेलणार नाही. निवडणूक आयोगाच्या डोळ्यात मोती बिंदू झाला नसेल तर समोरील खरी शिवसेना येथे येऊन पहा मग खऱ्या शिवसेनेची ताकद तुम्हाला समजेल. शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांनी केली आहे, निवडणूक आयोगाच्या बापाने नाही. भाजपला गल्लीतलं कुत्र विचारत नव्हतं त्यांना साहेबांनी साथ दिली. निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. या ढेकनांना तोफांची गरज नाही असा समाचार त्यांनी घेत ज्यांना मोठं केलं, ज्यांना वाढवलं त्यांनी धोका दिला असा घनाघात त्यांनी यावेळी केला.
बाळासाहेब ठाकरे यांचे नाव, फोटो वापरण्यावरून स्वतःच्या आई, वडिलांचे नाव लावायला लाज वाटत नसेल तर स्वतःच्या आई, वडिलांचे नाव लावून समोर या आणि लढा, मग तुम्हाला तुमची लायकी समजेल असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी देत मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात उद्योग धंदे आणले, हे मुख्यमंत्री झाले आणि उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर गेले. हे असले बाळासाहेबांचे विचार नव्हते. दिल्ली समोर शेपट्या आत घालून बसणारे बाळासाहेबांचे विचार नव्हते. ज्यांना खोके मिळाले नाही, ज्यांना मंत्रीपद देता आले नाही त्यांना सांभाळता सांभाळता यांच्या नाकी नऊ येत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
पुढे उद्धव ठाकरे यांनी इशारा देताना, मी तुम्हाला सावध करायला आलो आहे. सर्व उद्योगधंदे गुजरातकडे वळवले जात आहेत. कर्नाटकच्या निवडणुका आहेत म्हणून तेथे आयफोनचा उद्योग वाळविण्यात आला आहे.
फुटक्या काचाची बस घेऊन जाहिरात करणाऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवणार. ज्याला कायम कुटुंब बदलायची सवय लागलीय त्याला माझे कुटुंब, माझी जबाबदारी काय समजणार. अख्खा महाराष्ट्र माझा आहे, महाराष्ट्र माझे कुटुंब आहे असे त्यांनी म्हटले.
एक तोतरा हातात हातोडा घेऊन येतो आणि याला त्रास देणार, त्याला त्रास देणार असे बोलत राहतो. सत्तेचा दुरुपयोग करून कितीदिवस छळणार. मिंधे बोलले कि बरं झालं देशद्रोह्यांसोबत चहा-पाण कार्यक्रम टळलं मात्र एक लक्षात ठेवा आम्ही देशप्रेमी आहोत आणि आम्हाला देशद्रोही बोलला तर जीभ हासडून हातात देईन असा दमच त्यांनी यावेळी भरला. भाजपवर निशाणा साधताना आज सर्वात जास्त भ्रष्टाचारी भाजपात आहेत. कारण ज्या लोकांवर आरोप केले त्यांनाच आरोपकरून पक्षात घेतलं. त्यामुळे आज खंडोजी खोपडेची अवलाद राज्यात उपजू लागली आहे पण आमच्याकडे कानोजी सारखे स्वराज्य प्रेमी आहेत.
कसब्यात भाजपचा सुपडा साफ झाला. मेघालंय येथील निवडणुकीत अमित शहा जाऊन आले आणि संगमा यांच्यावर मोठं मोठे आरोप केले आणि लोकांनी उताणे केले तर लगेच संगमा यांच्यासोबत युती करायला तयार झाले याला काय म्हणायचे. संपूर्ण देश नासवण्याचा प्रयत्न हे करीत आहेत. शिवनेचा पक्षप्रमुख मिंधे तुम्हाला चालेल का, निवडणूक आयोगाने चोम्बडेपणा करु नये, मी निवडणूक आयोगाचा निर्णय मानत नाही. तुम्ही चोरांना साथ देणार का.
भाजपच्या अजेंड्यावर बोलताना, ज्यांचा स्वातंत्र्यात सहभाग नाही ते सध्या गादीवर बसले आहेत. भाजपला विनयचंद्र बोस हे नावतरी माहितेय का. नुसते देभक्ती असल्याचा आव आणायचा. मिंधे म्हणाले अमित शहा वडिलांसारखे, इकडे माझ्या वडिलांचा फोटो चोरला. नुसत्या मोदींच्या नावाने महाराष्ट्रात मते मागून दाखवा, आमच्या वडिलांचे फोटो चोरून, नाव वापरून यांना मते मागायला लागत आहेत. आमचे नाव, फोटो वापरायचे बंद करा मग यांना यांची लायकी कळेल. यांना आत्ताच रोखा नाहीतर 2024 नंतर हे देशात हुकूमशाही आणतील असा आरोप करत त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर चौफेर हल्ला चढवला. या सभेला मोठया प्रमाणावर गर्दी जमली होती. भाषण सुरु असताना अनेकजण उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा देताना पाहायला मिळत होते.