Categories: पुणे

दौंड शुगर कारखान्यात दोन कामगारांचा मृत्यू

राहुल अवचर

देऊळगाव राजे : आलेगाव (ता.दौंड) येथील दौंड शुगर साखर कारखान्यात आज रविवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली असून या दुर्घटनेमध्ये दोन तरुण कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबाबत दौंड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची म्हणून नोंद केली आहे.

दौंड शुगर कारखान्यात घडलेल्या या दुर्घटनेत संदीप कुंडलिक गरदाडे (वय २३, रा.पेडगाव ता.दौंड ) आणि गणेश सिताराम शिंदे ( वय २३,रा.शेडगाव पिसारे, ता.करमाळा, जि.सोलापुर ) या दोन दुर्दैवी कामगारांचा मुत्यृ झाला आहे. या घटनेबाबत फारुक दुगे यांनी पोलिसांना खबर दिली. कारखान्यातील नवीन प्लँटच्या गरम पाणी असणाऱ्या टाकी लाईनमध्ये संदीप हा फोमवर पाणी मारण्याचे काम करीत होता.

येथे काम करत असताना संदीप येथील एका गरम पाण्याच्या टाकीमध्ये पाय घसरुन पडला. त्याला टाकीत पडलेला पाहून खलाशी म्हणुन काम करीत असलेला गणेश शिंदे हा त्यास वाचविण्यासाठी गेला मात्र त्याचा तोल जाऊन तोही त्या टाकीत पडला. ही घटना समजताच तेथील इतर कामगारांनी इतरांच्या मदतीने त्या दोघांना टाकीतून बाहेर काढले मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. हे दोघेही गरम पाण्यात पडल्याने मयत झाल्याचे दिसुन आले. त्यांना तातडीने उपचारासाठी दौंड उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सतिश राऊत करीत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

13 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago