दौंड : आज महिला दिन असून तो सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मात्र याच महिला दिनी आज दौंड तालुक्यातील पारगाव आणि कासुर्डी या दोन गावांमध्ये दोन महिलांनी आत्महत्या केल्याने मोठी खळबळ माजली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पहिली आत्महत्येची घटना पारगाव (सालू-मालू) येथे घडली असून यामध्ये यमुना हनुमंत कारंडे हिने सयाजी ताकवणे यांच्या शेतातील विहिरीत आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे. हा अपघात आहे कि आत्महत्या याबाबत पोलिसांना विचारले असता त्यांनी सकृत दर्शनी ही आत्महत्या असल्याचे म्हटले आहे.
याबाबत मृताचे पती हनुमंत चंद्रकांत कारंडे (वय -51वर्षे व्यवसाय – नोकरी राहणार पारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे) यांनी यवत पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
दुसरी घटना (कासुर्डी ता.दौंड) येथे घडली असून पुनम बाळासो टेकवडे (वय 22 वर्ष राहणार कासुर्डी तालुका दौंड जिल्हा पुणे) हिने राहते घरात पत्र्याच्या लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबतची खबर लक्ष्मण बजाबा खेनट (वय -52वर्षे व्यवसाय – शेती राहणार कासुर्डी तालुका दौंड जिल्हा पुणे) यांनी यवत पोलिस ठाण्यात दिली आहे.
वरील दोन्ही प्रकरणांचा तपास यवतचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिस करत आहेत.