Breaking News : दौंड तालुक्यात कोरोनाचे दोन संशयीत रुग्ण आढळले

अब्बास शेख

दौंड : राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळत असताना आता पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातही दोन कोरोना बाधित संशयीत रुग्ण आढळून आले आहेत. या दोन संशयीत रुग्णांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. पुरुष रुग्ण ग्रामिण भागातील असून महिला रुग्ण दौंड शहरातील असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही रुग्णांची अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांची RTPCR नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. मात्र अजून तरी त्यांचा RTPCR रिपोर्ट मात्र आला नसल्याने तो रिपोर्ट आल्यानंतरच खरे काय ते समजणार आहे.

सध्या ग्रामिण भागातील एक रुग्ण हा ससून रुग्णालयात उपचार घेत असून दुसरा संशयित रुग्ण हा घरीच आयसोलेट करण्यात आला आहे. दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि कोणीही घाबरून जाऊ नये. तसेच ज्यांना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, धाप लागणे अशी लक्षणे दिसून आल्यास त्वरित आपल्या जवळील ग्रामिण रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे.