Categories: क्राईम

‘मामा’ समोरच त्याच्या दोन ‘भाचिंचा’ ट्रकखाली चिरडून ‘मृत्यू’, लोणीकाळभोर येथील हृदयद्रावक घटना

पुणे : लोणीकाळभोर येथे मामा आपल्या भाचिंना दुचाकीवर शाळेत सोडायला जात असताना भरधाव ट्रकने धडक दिल्याने मामा समोरच त्याच्या दोन अल्पवीन भाचिंचा ट्रकखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज शनिवार दिनांक 20/8/ 2022 रोजी सकाळी साडेसात वाजता पांडुरंग नवनाथ भिक्षे (वय 42 वर्षे, धंदा वाचमेन, राहणार काळभोर नगर, लेन नंबर दोन ,रूम नंबर 403, कवडी पाठ, तालुका हवेली ,जिल्हा पुणे) हे
कवडी पाठ येथून त्यांच्या भाची गायत्री नंदकुमार शितोळे (वय 17 वर्षे) व राजश्री नंदकुमार शितोळे (वय दहा वर्ष) यांना कन्या शाळा लोणी काळभोर मध्ये सोडण्याकरता जात असताना साडेसात वाजता लोणी स्टेशन चौक या ठिकाणी एका ट्रकने त्यांचे मोटरसायकलला मागून धडक दिलि.

या धडकेत मोटारसायकल वरील मामा आणि मुली वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्या गेल्यानंतर ट्रक मुलींच्या अंगावरून गेल्याने त्या जागीच मयत झाल्या. या अपघातात मात्र त्यांचा मामा हा बचावला असून त्याला कुठली दुखापत झाली नाही.

अपघातनंतर ट्रक चालक ट्रकसह पळून गेला होता मात्र त्यानंतर ट्रॅक पकडण्यात लोणीकाळभोर पोलिसांना यश आले आहे.

तर परशुराम सुकेशवर महतो (वय 26 रा.सीतामडी ,बिहार) या वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आले.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

18 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago