Categories: क्राईम

बुलेटवर येऊन चोरी करणाऱ्या हायटेक चोरट्यांना अटक, LCB ची कारवाई

दौंड : बुलेट गाडीवर येऊन दिवसा घरफोड्या करणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना जेरबंद करण्यात येऊन त्यांच्याकडून 3 गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) ला यश आले आहे.
या चोरट्यांनी दिनांक 8/02/2022 रोजी वेळूफाटा येथे श्रीमती बवून्तीदेवी विनोद महतो (रा.पार्वती वंदन सोसायटी फ्लॅट क्र.305 रा.वेळू फाटा ता.भोर जि. पुणे) ह्या कामानिमित्त घराबाहेर गेल्या असता दुपारी 12.15 ते 1.30 च्या सुमारास त्यांच्या राहत असलेल्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी लोखंडी कपाटातील तिजोरीत ठेवलेले सोन्या, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मिळून सुमारे 1 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला होता. तर त्याच दिवशी शिंदेवाडी (ता.भोर जि.पुणे) या आरोपींनी दिवसा घरफोडण्याचा प्रयत्न केला होता मात्र तेथे लोकांची चाहूल लागताच ते पळून गेले होते.
पुणे जिल्ह्यात दिवसा घरफोड्याचे प्रमाण वाढल्याने सदर गुन्ह्याचा तपास करण्याच्या सुचना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या भोर विभाग पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पोसई अमोल गोरे व पोसई शिवाजी ननवरे यांची दोन पथके तयार करून पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली 50 पेक्षा अधिक CCTV कॅमेरे चेक करून आरोपीचा माग काढत दिनांक 18/02/2022 रोजी सदर आरोपींना सातारा पुणे हायवे वरून जात असताना ग्रे रंगाच्या बुलेट गाडीसह ताब्यात घेतले होते. सदर गुन्ह्याबद्दल त्यांना विचारले असता आरोपी शशिकांत अनंत माने (वय 25 रा.वेताळनगर मोरया हाऊसिंग सोसायटी चिंचवड गाव) व आरोपी प्रणव सुरेश सिंग (वय 25 रा.उरुळी कांचन ता.हवेली जि.पुणे) यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. तसेच स्वामी नारायण मंदिर येथील सोसायटी मध्ये एक घर फोडी केल्याचे सांगितले असून या आरोपिंना बुलेट गाडीसह ताब्यात घेण्यात आले आहे.
या आरोपिंनी
1) राजगड पो स्टे गु र न 45/22 भा द वि 454,380
2) भारती विद्यापीठ पो स्टे पुणे शहर गु र न 83/22 भा द वि 454,457,380
3) राजगड पो. स्टे गु र न 405/21 भा द वि 454,380
वरील 3 गुन्हे केल्याचेही निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी डॉ.अभिनव देशमुख (पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.अशोक शेळके, पोलीस उप-निरीक्षक अमोल गोरे,शिवाजी ननवरे, पो.हवा बाळासाहेब कारंडे, राजू मोमीन, अजय घुले, पोना अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, पो कॉ मंगेश भगत, धीरज जाधव, चालक सहा फौजदार मुकुंद कदम, दगडू वीरकर यांचे पथकाने केली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

8 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

10 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

12 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago