Categories: क्राईम

हातात कोयते घेऊन दौंड शहरात दहशत माजविणाऱ्या दोघांना अटक

दौंड : हातात कोयते घेऊन दहशत माजविणाऱ्या दोघांना दौंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुणे शहरात कोयता गॅंग ने दहशत माजवली असताना तसाच प्रकार दौंड शहरात करू पाहणाऱ्यांना दौंड पोलिसांनी वेळीच अद्दल घडवली आहे. राकेश टिळक जगताप (वय 28 वर्षे) आणि सचिन सुरेश नलावडे (वय 30 वर्षे, दोघे रा.वडारगल्ली ता-दौंड जि-पुणे) अशी या आरोपींची नावे असून त्यांच्या विरोधात अक्षय बाळु घोडके (पोलीस कॉन्स्टेबल, दौंड पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक- 7 ऑगस्ट रोजी वरील आरोपी हे दौंड शहरातील सिध्दार्थनगर येथे तसेच परिसरामध्ये हातात कोयते घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न करत फिरत होते. यावेळी दौंड शहरात पेट्रोलिंग करत असलेले फिर्यादी अक्षय घोडके व सहा पोलीस फौजदार चौधरी यांना राकेश टिळक जगताप व सचिन सुरेश नलावडे हे मोटार सायकलवरुन दौड शहराच्या हद्दीतील सिध्दार्थनगर येथे दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने आपल्या हातामध्ये कोयता घेवुन फिरत असल्याची माहिती मिळाली. ही माहीती मिळाल्यानंतर फिर्यादी तसेच सहा पोलीस फौजदार चौधरी, पोलीस हवालदार थोरात, पोलीस कॉन्स्टेबल वाघ, चालक पोलीस हवालदार देसाई असे सर्वजण त्यांना माहिती मिळालेल्या ठिकाणी पोहोचले.

यावेळी आरोपी हे अॅक्सेस मोटार सायकलवरुन फिरत असल्याचे त्यांना दिसले. त्यावेळी पोलिसांनी या दोघांना थांबवुन त्यांची अगंझडती घेतली असता राकेश टिळक जगताप याकडे एक कोयता मिळुन आला. त्यानंतर त्यादोघांना ताब्यात घेवुन दौंड पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आले. पुणे जिल्ह्यामध्ये मा. जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय पुणे यांचे कार्यालयाकडुन आदेश क्र.पगक/कावि/3878/2023 दिनांक 24/7/2023 अन्वये पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) चा आदेश जारी केला असुन या अन्वये पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दुष्टीकोनातून शस्त्रे, सोटे, तलवारे, दंड, काठ्या, बंदुका व शरीरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर नेण्यात मनाई केली आहे.

मात्र तसे असतानाही आरोपी राकेश टिळक जगताप व सचिन सुरेश नलावडे यांनी दौंड शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने मोटार सायकलवरुन बेकायदेशिर कोयत्या सारखे घातक शस्त्र घेवुन फिरत असल्याने त्यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम-4 (25) सह म.पो. का. कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार गावडे करीत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

7 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

9 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

11 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago