Categories: Previos News

two murderer arrest in Daund : ‛खून’ करून फरार असलेले ‛मोक्का’तील 2 आरोपी कुरकुंभ MIDC मध्ये पकडले, LCB ची मोठी कारवाई



| सहकारनामा |

पुणे : दिनांक १५/०२/२०२१ रोजी सराटी ता. इंदापूर येथे फिर्यादी आदर्श गायकवाड व त्यांचा मित्र अक्षय चंदनशिवे असे इंदापूर – अकलूज रोडने अकलूज बाजूकडे जात असताना ७ आरोपीनी ३ मोटार सायकल वर  येवून अक्षय यास तू आदर्श सोबत का फिरत असतोस तुला लय मस्ती आली आहे, तुला संपवतोच असे म्हणून शिवीगाळ करत लोखंडी पाईप , टॉमी, वेळूची काठी, लाकडी दांडके याने मारहाण करून अक्षय राजेंद्र चंदनशिवे (वय २२ रा.अकलूज) याचा खून केला होता.

यावरून इंदापूर पो स्टे गु र नं.१२२/२०२० भादवि३०२,३२४,१४३,१४८,१४९ अनुसुचित जाती/जमाती १९८१ चे कलम ३(२)(४अ) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदरच्या गुन्ह्यामध्ये एकूण ५ आरोपीना अटक करण्यात आली होती तर यातील २ आरोपी फरार होते.

सदरचा गुन्हा हा संवेदशील व आरोपिंचे पूर्व रेकॉर्ड गुन्हेगारी स्वरूपाचे असल्यामुळे सदरचा गुन्ह्यात मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम १९९९चे कलम 3(१)(i)(ii)३(४) लावण्यात आला होता.

आज दिनांक १८/०५/२०२१ रोजी मा.पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे आदेशानुसार covid-१९ चे अनुषंगाने पुणे – सोलापूर हायवे वर LCB पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बतमीदारामार्फत माहिती मिळाली की  इंदापूर खुनातील फरार आणि मोक्कातील आरोपी आकाश उर्फ आण्णा राजेंद्र कोळेकर आणि  सोमनाथ बुरुदेव रूपनवर (रा.व्यकटनगर अकलूज ता.माळशिरस जि. सोलापूर) हे कुरकुंभ midc येथे येणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा लावून आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचेकडे विचारपूस केली असता त्यांना त्याची नावे आकाश उर्फ आण्णा राजेंद्र कोळेकर आणि सोमनाथ बुरुदेव रूपनवर अशी असल्याचे सांगितले.

पोलिसांनी या आरोपींची वैद्यकीय तपासणी करून इंदापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले.

सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती श्री. मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट , पोसई शिवाजी ननवरे,पो हवा अनिल काळे,रविराज कोकरे,दत्ता तांबे, पो ना विजय कांचन, राजू मोमीन, अभिजित एकशिगे पो कॉ अमोल शेडगे, मंगेश भगत, धीरज जाधव, बाळासाहेब खडके, दगडू वीरकर, महिला पोलीस अंमलदार सुजाता कदम, पूनम गुंड यांच्या पथकाने केली.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

11 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago