दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथे दोन सख्ख्या भावांचा अपघाती मृत्यू झाला आहे. पुणे सोलापूर हायवेवरील केडगावच्या हद्दीत असणाऱ्या पत्रा कंपनीजवळ हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत असून एका भरधाव वाहणाने त्यांना धडक दिल्याने या दोघांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून माहिती मिळत आहे.
कैलास शेळके आणि पांडुरंग शेळके अशी या दोन भावंडांची नावे असून ते देशमुख मळा, केडगाव (ता. दौंड) येथील रहिवासी होते. दि. 10 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांना पुणे सोलापूर हायवेवर एका चारचाकी अज्ञात वाहनाने जोरदार धडक देऊन ते वाहन पसार झाल्याचे सांगितले जात आहे.
कैलास शेळके आणि पांडुरंग शेळके या भावांच्या अपघाती मृत्यूच्या बातमीने केडगाववर शोककळा पसरली आहे. अपघाताची तक्रार देण्याचे काम यवत पोलीस ठाण्यात सुरु होते.