वरवंड, दौंड : दौंड तालुक्यातील वरवंड येथे एका परप्रांतीय व्यक्तीचा खून करण्यात आला होता, या खून प्रकरणी आता यवत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ५ |०८| २०२५ ते दिनांक ६ |०८| २०२५ रोजी सकाळी ७.४५ च्या अगोदर वरवंड ता.दौंड जि.पुणे या गावच्या हद्दीमध्ये पुणे-सोलापुर हायवे रोडच्या कडेला मयुर सरनोत यांच्या मालकीच्या पडीक जमीनीमध्ये मयत शैलैंद्रकुमार सुशिलकुमार विमल (वय-३३ वर्षे, मुळ रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. वखंड, वरसगाव) याचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून त्याच्या डोक्यात सिमेंट व विटाचा मिक्स असलेला तुटलेला ठोकळा मारून खुन केला होता.
यवत पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना तांत्रिक विश्लेषण,सी.सी.टी.व्ही. तपासणी करून गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळवत घेवुन सदर मयत नामे शैलैंद्रकमार सुशिलकुमार विमल यास विनोद उर्फ नंदु दत्तात्रय रणधीर (रा. वरवंड ता.दौंड जि.पुणे) व गणेश उर्फ अक्षय तानाजी उमाटे (वय-२८ वर्षे मूळ रा.जि.धाराशिव,सध्या रा.कानिफनाथ नगर वरवंड ता.दौंड) या दोघांनी संगनमताने मयताच्या डोक्यात विटा व सिमेंटचे मिक्स असलेले ठोकळे घालुन खुन केला असल्याची माहीती मिळाली होती. त्यामुळे यवत पोलिसांनी आरोपिंना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा खुन केल्याचे कबुल केले आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामिण चे पोलीस अधिक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार (बारामती विभाग) उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस (दौंड विभाग) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविण संपांगे, सहायक पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक भोसले, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक संजय जगदाळे, सहा.फौजदार महेंद्र फणसे, पोहवा गुरूनाथ गायकवाड, पोहवा संदीप देवकर,पोहवा, अक्षय यादव, पोलिस हवालदार विकास कापरे, पो.हवा. महंदर चांदणे, पोहवा, राम जगताप, पो.ह. दत्तात्रय काळे, पो.हवा प्रमोद गायकवाड,
तसेच पोहवा. हिरालाल खोमणे, पोहवा मुटेकर,पोहवा पानसरे, पोहवा विनायक हाके, पोकॉ, भारत भोसले, पोकॉ.मारूती बाराते, पोकॉ. प्रतिक गरूड, पोकॉ मोहन भानवसे, पोकॉ प्रणव ननवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे अजित भुजबळ पोहवा योगेश नागरगोजे, राजु मोमीन यांनी केली असुन वरील दोन आरोपी अटक करण्यात आले आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एस.जी. शेख हे करीत आहेत.